शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल गहाळ प्रकरणाचा वाद विकोपाला

By admin | Updated: August 27, 2014 23:23 IST

स्थानिक रोहित बिअरबार व रेस्टारंटमधून चोरीस गेलेल्या मोबाईलचे प्रकरण पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर मारहाणीपर्यंत पोहोचले आहे. पंचायत समिती सदस्यांचा सहभाग असलेल्या

गोंडपिंपरी : स्थानिक रोहित बिअरबार व रेस्टारंटमधून चोरीस गेलेल्या मोबाईलचे प्रकरण पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर मारहाणीपर्यंत पोहोचले आहे. पंचायत समिती सदस्यांचा सहभाग असलेल्या या भांडणाचे हे प्रकरण चर्चेचे ठरत आहे.सदर बिअरबार पंचायत समिती सदस्य रामचंद्र कुरवटकर यांच्या मालकीचे आहे. कुणाल गायकवाड यांनी या बारमधून मोबाईल चोरी गेल्याची तक्रार पोलिसात केली होती. त्यावर त्यांनी मोबाईल चोरीच्या आरोपाचे खंडन करुन हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे सांगितले होते. या मुद्यावरून काल मंगळवारी रात्री गायकवाड व कुरवटकर यांच्यात रंगलेला शाब्दिक वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात दोघांनीही एकमेकांविरूद्ध तक्रारी केल्याने पोलिसांनी दोघांवरही गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. रोहित बारमधून मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार कुणाल गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात पोलिसात केली होती. त्यावर, हा ग्राहकाचा निष्काळजीपणा असल्याचे सांगत बारची बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याचे रामचंद्र कुरवटकर यांनी म्हटले होते. या प्रकरणावरून काल सायंकाळी शिवाजी वार्ड क्र. ३ मधील मूल रोड स्थित एका पानटपरीवर कुणाल गायकवाड व पंचायत समिती सदस्य कुरवटकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कुरवटकर यांनी कुणाल गायकवाडविरोधात जीवे मारण्याची धमकी, लाकडी काठीने मारहाण करून अश्लील शिवीगाळ केल्याची तक्रार केली. तर रामचंद्र कुरवटकर, बार मॅनेजर संजय चंदेल व इतर दोन जणांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार गायकवाड यांनी दाखल केली आहे. कुरवटकर व सहकाऱ्यांवर भांदवि कलम ३०७ तर, गायकवाडविरोधात ५०४,५०६, ३२४ गुन्ह्याची नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)