मनपा नगरसेवकांचा निषेध : रस्ते, नाली दुरुस्ती करण्याची मागणी चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील खराब रस्ते, नाली दुरुस्ती करण्यात यावी या मागणीला घेवून शुक्रवारी सकाळी १० तुकूम मार्गावर मनसेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडो नागरिकांनी सहभाग घेत मनपा नगरसेवकांविरोधात संताप व्यक्त केला.चंद्रपूर शहरातील धांडे हॉस्पीटल ते ख्रिस्तानंद हॉस्पीटल मार्ग तसेच शहरातील मुख्य व छोटे मार्ग खड्यामुंळे चालण्यास कठीण झाले आहेत. खराब रस्त्यांमुळे नागरिकांना अपघाताला बळी पडावे लागत आहे. मनपा, नगरसेवक नागरिकांना सोयीसुविधा देण्यास अपयशी ठरले आहेत. मनपाचे खराब, खड्डेमय रस्त्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेने एक दिवसीय धरणे आंदोलन केले. याबाबत मागण्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले. समस्या न सोडविल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनदीप रोडे यांनी दिला आहे. या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष विजय मराठे, शहर उपाध्यक्ष बाळा चंदनवार, कपिल डंभारे, नगरसेवक सचिन भोयर, विभाग अध्यक्ष अंजू लेनगुरे, शहर सचिव सचिन कोतपल्लीवार, मनविसे शहर उपाध्यक्ष नितेश जुमडे, शहर उपाध्यक्ष अभिनव देशपांडे, संदीप अरडे, निरल अग्रवाल, दिनेश इंगळे, नितीन बावणे, धम्मदीप रामटेके, आनंद चौबे, रजत हेकाड, रुचा रंदई, सुभद्रा मांदाडे, वैशाली शेरकी आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
चंद्रपुरातील समस्यांवर मनसेचे आंदोलन
By admin | Updated: November 19, 2016 00:55 IST