शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

महापरीक्षा विरोधात मनसे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : स्पर्धा परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाने महापरीक्षापोर्टलचे खाजगी कंपनीला कंत्राट दिले. मात्र या कंपनीद्वारे ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पोर्टल बंद न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्पर्धा परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाने महापरीक्षापोर्टलचे खाजगी कंपनीला कंत्राट दिले. मात्र या कंपनीद्वारे सर्वत्र सावळा गोंधळ झाला असून विद्यार्थ्यांचा विश्वास उडाला आहे. सदर पोर्टल बंद करून पूर्वीप्रमाणेच परीक्षा घ्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, पोर्टल बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याची इशाराही यावेळी देण्यात आला.महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी संघटनेने जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष विवेक धोटे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये पोर्टलबाबत तीव्र असंतोष असल्याने या विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला.या पोर्टलचे अनेकवेळा सर्व्हर डाऊन राहते, प्रत्येक परीक्षेवेळी नवीन प्रोफाईल बनवून नव्याने माहिती भरावी लागते, आॅनलाईन परीक्षेसाठी अतिरिक्त फी आकारली जाते, परीक्षा देण्यासाठी अनेकवेळा उमेदवारांना दुसºया जिल्ह्यात जावे लागते, वेळेवर सूचना न देणे, लहान व खाजगी परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसणे, अपुरी सुरक्षा, वेळेवर परीक्षा न घेणे, निकाल उशिरा लावणे, डमी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविणे, खासगी संगणक सेंटरमध्ये परीक्षा घेणे, बी.ए., बी.कॉमचे विद्यार्थी पर्यवेक्षक असणे, अनुपस्थित विद्यार्थ्यांची नावे पात्र उमेदवारांच्या यादीत असणे, असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहे. त्यामुळे या अनागोंधी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल त्वरित रद्द करावे, महापोर्टल कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, पदभरती एमपीएससी तर्फे घ्याव्या, गोंधळ व गैरप्रकार झालेल्या परीक्षा रद्द कराव्या, संयुक्त परीक्षा रद्द करून स्वतंत्र परीक्षा घ्यावी, जाचक अटी रद्द कराव्या, रिक्त जागांवर त्वरित पदभरती करावी, प्रलंबित असलेले परीक्षांचे निकाल त्वरित लावावे आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या.शिष्टमंडळात मनसेच्या सुनीता गायकवाड, भरत गुप्ता, प्रकाश नागरकर, प्रतिमा ठाकूर, मनोज तांबेकर, नितेश जुमडे, राकेश बोरीकर, नितीन पेंदाम, चैतन्य सदाफळ, निखिल परबत, अनुप माथनकर, अविनाश रोडे, ऋषिकेश बालमवार, शिरीष मानेकर, करण नायर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :MNSमनसे