शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसह आमदारांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा ते करनूल (तेलंगणा) व वरोरा ते राजनांदगाव (छत्तीसगढ) ७६५ के.व्ही.डी.सी. ट्रॉन्समिशन लाईनमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसाई भरपाई देण्यात यावी, यासाठी शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी गुरुवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह मुंडण करून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनात आ. बाळू धानोरकर यांच्यासह प्रवीण बांधूरकर, वासुदेव ठाकरे, ...

ठळक मुद्देटॉवरच्या मोबदल्याचा प्रश्न : न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा ते करनूल (तेलंगणा) व वरोरा ते राजनांदगाव (छत्तीसगढ) ७६५ के.व्ही.डी.सी. ट्रॉन्समिशन लाईनमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसाई भरपाई देण्यात यावी, यासाठी शिवसेनेचे वरोरा-भद्रावतीचे आमदार बाळू धानोरकर यांनी गुरुवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह मुंडण करून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनात आ. बाळू धानोरकर यांच्यासह प्रवीण बांधूरकर, वासुदेव ठाकरे, दुर्वास हेपट, संदीप लोहे, देवानंद, मोरे, पुरुषोत्तम पावडे, पद्माकर, कडुकर, गोपाल सातपुते व किशोर राजुरकर या शेतकऱ्यांसह शिवसेनेचे रमेश तिवारी, अनिल धानोरकर, रमेश देशमुख, सोहेल शेख, राजेश नायडू, सिद्दी यादव, मनोज पाल, प्रमोद मगरे, भारती दुधाने सहभागी झालेले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या टॉवर लाईन कामाच्या सद्यस्थितीबाबत २१ जुलै रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीत उपविभागीय अधिकारी समितीकडून मुल्यांकन करून संबंधित शेतकऱ्यांना जागेचा अंदाजित मोबदला देण्याचे ठरले होते. या बैठकीच्या कार्यवृत्ताला केराची टोपली दाखविल्याचा आरोप वरोराचे आ. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी यावेळी केला.वरोरा पॉवर ग्रीड ट्रॉन्समिशन लिमिटेड या कंपनीच्या अखत्यारीत सिम्प्लेक्स, गॅमन, व बजाज या कंपन्या टॉवर उभारणीेचे व तार ओढण्याचे काम करीत आहेत. शेतीमधून जाणाऱ्या या लाईनचा वापर वाणिज्य वापरासाठी होत असल्यामुळे संबंधित शेतकºयांना याचा मोबदला ३१ मे २०१७ च्या जीआरनुसार तसेच नोंदणी महानिरीक्षक (आ.जी.आर.) च्या निर्देशानुसार संभाव्य अकृषक वाणिज्याचा दर आकारण्यात यावा. टॉवरमध्ये व लाईनमध्ये एकापेक्षा अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात असल्यामुळे सदर जमिनीचा उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयामार्फत अति तातडीच्या मोजणीचे पैसे भरून मोजणी करून शेतकºयांना योग्य मोबदला देण्यात येत आहे. यात कुठेही हयगय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. या संदर्भात माहिती देण्यात आली. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी केल्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ झाली.हे सर्व विषय चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात होणाºया पॉवर ग्रीडच्या टॉवर लाईनवर लागू करण्यात आलेले आहे. तसेच पॉवर ग्रीड तथा इतर कंपन्यांमार्फत उभारण्यात टॉवरचे बांधकाम वा टॉवरची उभारणी करीत असताना शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असते. तसेच शेजारच्याही शेतकºयांचे नुकसान होत असते. सदर शेतकऱ्यांना देखील शेतपिकाचा योग्य मोबदिला देण्याचेदेखील कंपनीने मान्य केले. अशा सर्व बाधित शेतकऱ्यांची प्रकरणे निकाली काढून मोबदला निश्चित करून आपल्या स्तरावर मोबदला देण्यात यावा, अशी मागणी आ. बाळू धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मागणीकडे लक्ष न दिल्यास आंदोलन तिव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.टॉवर उभारणीच्या वेळेस पिकांचे नुकसानलाईन ओढताना (दोन लाईनच्या मधील) पिकांचे नुकसानलाईन व टॉवरमधील कॉरीडोअरच्या मध्ये येणाऱ्या झाडांचे नुकसानफाउंडेशनच्या जमिनीचे पैसे ३१ मार्च २०१७ च्या जी. आर. नुसार खोदकाम केलेल्या जागेचा मोजमाप करून मोबदला देण्यात यावा.दोन लाईनमधील जागेचे पैसे दि. ३१ मार्च २०१७ नुसार देण्यात यावे.चुकीच्या जागेवर टॉवर फाऊंडेशन झाले अशा शेतकºयांना मोबदला द्यावा.खोदकाम करीत असताना जनावरे मृत्यूमुखी पडलेल्यांना मोबदला देण्यात यावा.