शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

आमदारांना आली जाग, जखमीची भेट

By admin | Updated: September 7, 2016 00:49 IST

वाघाच्या हल्ल्यात टोले नांदगाव येथील साईनाथ येलमुले हा युवक रविवारी जखमी झाला.

प्रकृतीची विचारपूस : एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन नोंदविली तक्रार गोंडपिंपरी : वाघाच्या हल्ल्यात टोले नांदगाव येथील साईनाथ येलमुले हा युवक रविवारी जखमी झाला. घटनेची माहिती एफडीसीएमला देण्यात आली. तक्रार घेवून पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली. पण सुट्टीचे कारण पुढे करीत तक्रार घेण्यास मज्जाव केला. कुणीही दखल घेत नसल्याने कार्यकर्त्यांनी आ. संजय धोटे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. पण त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. हा संतापजनक प्रकार ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून मंगळवारी समोर आणला. त्यामुळे आमदार व एफडीसीएमचे अधिकारी जागे झाले. आ. संजय धोटे यांनी मंगळवारी थेट रूग्णालय गाठून जखमी युवकाची विचारपूस केली. तर एफडीसीएमचे अधिकारी जखमीच्या घरी पोहोचून तक्रार नोंदवून घेतली. आमदार धोटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली व तत्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले. रविवारी साईनाथ रामजी येलमुले (२७) हा युवक जंगलात गुरे चारत असताना त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला. बचावासाठी तो रांजीच्या झाडावर चढला असता वाघाने त्याचा पाय पकडून ओढत नेले. याचवेळी वडील घटनास्थळी पोहचून आरडाओरड केल्याने व जनावरांचा कळप आल्याने वाघाने साईनाथला सोडून कळपाकडे धाव घेतली. घटनेची माहिती कळताच गावातील काही कार्यकर्त्यांनी एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, कार्यालयातही गेले. घटनेची तक्रार घेवून पंचनामा करण्याची मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी सुट्टीचे कारण पुढे करत तक्रार घेण्यास नकार दिला. वारंवार विनंती करूनही त्यांनी तक्रार घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची प्रथमता धाबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमीला उपचारासाठी दाखल केले. त्यांची गंभीर अवस्था बघता त्याला गोंडपिंपरीवरुन चंद्रपूरला रेफर करण्यात आले. पण पैशाअभावी त्याला स्वगावी परतावे लागले. यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी साईनाथची कुणीच दखल घेत नसल्याने आमदार संजय धोटे यांच्याशी संपर्क साधला. मात्र तेही प्रतिसाद न देता वारंवार फोन कापत होते. हा प्रकार संतापजनक होता. आमदारांनी उदासिनता दाखविल्याने शेवटी कार्यकर्त्यांनी बाहेर तालुक्यातील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बोलाविले व साईनाथला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. एका गरीब गुराख्याला मदतीसाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींची उदासिनता ‘लोकमत’ने समोर आणली. लोकमतच्या वृत्ताने साईनाथच्या कुटुंबियांची तक्रार घेण्याकरीता एफडीसीएमचे अधिकारी थेट त्याच्या टोले नांदगावात पोहोचले. पत्नीच्या नावाने तक्रार नोंदवून घेत घटनेचा पंचनामाही केला. (शहर प्रतिनिधी)