शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या वादातून मित्राची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:32 IST

जुगारातील पैशावरुन झालेल्या वादात आपल्या मित्राचीच धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शहरातील महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात घडली.

ठळक मुद्देजुगारातील पैशावरुन झालेल्या वादात आपल्या मित्राचीच धारदार शस्त्राने हत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जुगारातील पैशावरुन झालेल्या वादात आपल्या मित्राचीच धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शहरातील महाकाली कॉलरी आनंद नगर परिसरात घडली. सोनू सेवकराम शर्मा (२८) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शंकर झाडे रा. महाकाली कॉलरी (२८) याला ताब्यात घेतले आहे.शंकर झाडे व सोनू शर्मा हे दोघे मित्र होते. दोन दिवसांपूर्वी जुगार खेळताना सोनू शर्माने शंकरचे पैसे दिले नाही. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान, आज सकाळी शंकरने सोनूच्या घराकडे जाऊन त्याला पैशाबाबत विचारणा केली. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी शंकरने सोनूला लाठीकाठीने मारहाण करुन धारदार शस्त्राने त्याच्या छातीवर वार केला. यामध्ये सोनू गंभीर जखमी झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. भगत यांना मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी शंकर झाडे याला महाकाली कॉलरी परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार एस. एस. भगत करीत आहेत.