शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘मिशन अंत्योदय’चा कौशल्य रथातून जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:20 IST

१ ते १५ आॅक्टोबर पर्यंत मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतीमध्ये पथदर्थी ग्रामसमृध्दी व स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे१ ते १५ पर्यंत पंधरवडा : स्वच्छतेच्या कार्यक्रमावर जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १ ते १५ आॅक्टोबर पर्यंत मिशन अंत्योदय अंतर्गत जिल्ह्यातील १५७ ग्रामपंचायतीमध्ये पथदर्थी ग्रामसमृध्दी व स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यामध्ये सर्व गावांमध्ये विविध स्वच्छतेच्या कार्यक्रमाचा जागर होत आहे.या पंधरवड्यात लोकांचा ग्रामसभेत सहभाग व गावाचा विकास आराखडा तयार करणे, स्वच्छता विषयी जनजागृती, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाच्या कामास सुरूवात करणे आणि विविध योजनेची जाणीव जागृती करण्याकरिता कौशल्य रथासह कलापथकाची सोबत असल्याने विकासाची गंगा आपल्या दारी येणार आहे. तिचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी मंगळवारी कौशल्य रथाचे स्वागत करताना केले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, गोंडपिपरीचे गटविकास अधिकारी यशवंत मोहितकर, सहाय्यक गटविकास अधिकारी आशा ढवळे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन देशमुख यांच्या उपस्थित कौशल्य रथाला हिरवी झेंडी दाखवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.मिशन अंत्योदय अंतर्गत १५७ ग्रामपंचायतीमध्ये पायाभुत सर्वेक्षणाचे काम १ ते १५ आॅक्टोबर या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये गावातील विविध संसाधने आणि विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आवश्यक माहितीची नोंद ‘समृध्द ग्राम’ या अप्लीकेशनवर आॅनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण गावातील महिला बचत गट सदस्य, ग्राम रोजगार सेवक व एक महाविद्यालयीन विद्यार्थी या चमुमार्फत करण्यात येणार आहे. या सर्व चमूंचे प्रशिक्षण तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार गावाला आवश्यक सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होणार आहे. गावातील सर्वेक्षणातून प्राप्त माहितीचे संकलन झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये माहितीचे प्रमाणीकरण करून त्यानंतर संकलीत माहिती अ‍ॅपवर अंतिम आॅनलाईन भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे.