शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
3
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
4
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
5
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
6
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
7
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
8
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
9
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
10
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
11
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
12
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
13
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
14
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
15
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
16
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
17
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
18
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
19
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
20
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

युवकांनी लावलेल्या वृक्षांना समाजकंटकांनी लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2017 01:29 IST

तालुक्यातील खेमजई या गावातील युवकांनी ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून परिसरात हिरवळ रहावी

खेमजई परिसरातील घटना : गाव विकास संस्थेच्या उपक्रमावर फेरले पाणी वरोरा : तालुक्यातील खेमजई या गावातील युवकांनी ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून परिसरात हिरवळ रहावी तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश देत पोळ्याच्या पाडव्याला ५ एकर शासकीय जमिनीवर ५ हजार वृक्षांची लागवड केली होती. त्या जागेला काही समाजकंटकांनी वनवा लावून झाडे नेस्तानाभूत केल्याची घटनाबुधवारला १९ एप्रिलला उघडकीस आली . खेमजई परिसरातील १४ हजार एकर परिसरात जंगल व्यापले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. या भागातील गारगोटी व पांढरा दगड उपलब्ध असल्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. याबाबत ग्राम पंचायतमध्ये उखननासाठी ना हरकत प्रमाणपत्र न देण्यासाठी ठरावही मंजूर करण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायतीच्या ठरावाला न जुमानता तेथे अवैध उत्तखनन करण्यात येत आहे. जा जंगलात मागील पोळ्याला खेमजई येथील गाव विकास संस्थेच्या नवयुवकांनी ५ एकरमध्ये विविध जातीच्या ५ हजार वृक्षांची लागवड केली होती. बहुतांश युवक पोळ्याच्या पाडव्याला मद्याच्या आहारी जावून गावात टवाळक्या करीत असतात. पण या युवकांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश देत पोळ्याचा पाडव्याला पाच हजार वृक्ष लावून हा सण साजरा केला होता. पण या भागात अवैध उत्खनन करणाऱ्या काही समाजकंटकांनी कशाचीही तमा न बाळगता परिसरात अवैध अतिक्रमण करण्याकरिता जागा मोकळी व्हावी म्हणून वनवा लावला आणि यात ५ हजार वृक्ष नेस्तनाभूत झाले. हा प्रकार युवकांच्या लक्षात येताच संस्थेचे पदाधिकारी व युवक घटनास्थळी पोहचले तर त्यांना घटनास्थळी अवैध उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची सर्व माहिती तहसीलदार राजेश भांडारकर यांना देताच त्यांनी घटनास्थळी तलाठी यांना पाठविले व मौका तपासणी करून अवैधऊतखानाकरिता वापरण्यात येणारे साहित्य ग्राम पंचायत कार्यालयात जमा करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी, रमेश चौधरी, लंकेश भेले आदी युवक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)