शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

क्षुल्लक कारणावरून अल्पवयीन मुलाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:27 IST

राजुरा येथील शिवाजी स्टेडियम येथे सोमवारी सकाळी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला. त्याची हत्या करण्यात आल्याचे परिस्थितीवरून पोलिसांनी ओळखले आणि अवघ्या दोन तासातच आरोपीला अटक केली.

ठळक मुद्देदोन तासात आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा येथील शिवाजी स्टेडियम येथे सोमवारी सकाळी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळला. त्याची हत्या करण्यात आल्याचे परिस्थितीवरून पोलिसांनी ओळखले आणि अवघ्या दोन तासातच आरोपीला अटक केली. शेजारच्या मुलीकडे बघतो, या क्षुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.संदेश रवींद्र ठाकूर (१५) रा. इंदिरा नगर असे मृतकाचे नाव असून तो येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय राजुरा येथे दहावीमध्ये विद्यार्थी शिकत होता. राजुरा येथील शिवाजी स्टेडीयम परिसरात अज्ञात मुलाचा मृतदेह सकाळी फिरायला जाणाऱ्यांना दिसला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, राजुराचे ठाणेदार बाळू गायगोले हे घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीवरून सदर मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी कसून चौकशी करीत दोन तासात आरोपी बाल्या उर्फ राकेश वाघमारे (२९) याला अटक केली. आरोपी हादेखील इंदिरा नगर येथे राहतो.मृतक संदेश हा आरोपीच्या शेजारी असलेल्या व मध्यप्रदेशातून आलेल्या मुलीला बघतो म्हणून आरोपीने संदेशला रात्री स्टेडीयम परिसरात नेले व काठीने मारून त्याची हत्या केली, अशी माहिती राजुराचे ठाणेदार बाळू गायगोले यांनी दिली.