शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

परमीटविनाच धावतात मिनीबस

By admin | Updated: November 27, 2014 23:31 IST

परिवहन नियमांचे उल्लंघन करून जिल्ह्यात मिनीबस धावत आहेत. शहर परमीटच्या नावावर राज्य शासनाचा कोट्यवधीचा कर या माध्यमातून बुडविला जात आहे. यासोबत बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या

चंद्रपूर : परिवहन नियमांचे उल्लंघन करून जिल्ह्यात मिनीबस धावत आहेत. शहर परमीटच्या नावावर राज्य शासनाचा कोट्यवधीचा कर या माध्यमातून बुडविला जात आहे. यासोबत बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप विधानसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल यांनी पत्रकार परिषदेत केला. १५ दिवसात प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी आरंभली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.परिवहन विभागाच्या नियमानुसार प्रवासी गाडीसाठी सात वर्षांचे परमीट दिले जाते. नियमानुसार सात वर्षांनंतर त्याचे नुतनीकरण केले जाते. मात्र अनेक मिनीबसच्या मालकांकडून त्याचे नुतनीकरण केले जात नाही. वाहनचालकाला जर वाहन चालवायचे असेल तर परिवहन विभागाकडून ते बदली करून शहर परमीट घ्यायचे असते. त्यानंतर वाहनचालक वाहन घेऊन एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करू शकतो. परिवहन विभागाच्या या नियमांचे पालन सर्व मिनीबस चालकांना बंधनकारक आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात परिवहन विभागाचे या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.शहर परमीटसाठी वर्षाला ३२ हजार रुपये देय भरावा लागतो. ही रक्कम वाहतुकीद्वारे भरण्यात येते. परंतु परिवहनासाठी प्रति दिवसाच्या दराने आरटीओकडून तात्पुरते परमीट असणे आवश्यक आहे. या वाहतूक परमीटसाठी शासकीय नियमानुसार प्रति सीट १०.८० रुपये दराने कर आकारला जातो. मात्र हा कर बुडविला जात असल्याचे कत्याल यांचे म्हणणे आहे. यात शासनाचे कोट्यवधीचे नुकसान होत असल्याने राज्य शासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन संवेदनशिलता दाखवावी व या कर चोरीवर आळा घालावा. येत्या १५ दिवसात यासंदर्भात चौकशी केली नाही तर आरटीओंना घेराव घालण्यात येईल, असा इशाराही विधानसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)