शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांकडे महावितरणची कोट्यवधींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:21 IST

महावितरणची ग्राहकांकडील थकबाकी दिवसेंदिवस चांगलीच वाढत आहे. त्यामुळे महावितरण सध्या अडचणीत सापडले आहे.

ठळक मुद्देमहावितरण आक्रमक : घरगुती ग्राहकांकडे आठ कोटी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महावितरणची ग्राहकांकडील थकबाकी दिवसेंदिवस चांगलीच वाढत आहे. त्यामुळे महावितरण सध्या अडचणीत सापडले आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात घरगुती ग्राहकांकडे तब्बल आठ कोटी ६५ लाखांच्या घरात थकबाकी आहे. वाणिज्यिक गाहकांकडे तीन कोटी २३ लाख तर औद्योगिक ग्राहकांकडे ५७ लाख ९५ हजार रुपये थकित आहेत. या थकबाकीदारांविरुध्द महावितरणच्या चंद्रपूर कार्यालयाने आक्रमक पाऊल उचलत धडक मोहीम सुरू केली आहे.महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाची चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील पाणीपुरवठा योजनांकडे एक कोटी ३५ लाख तर सरकारी कार्यालयाकडे ९४ लाख थकबाकी आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा ख्ांडीत ग्राहकांकडे ४० कोटी ९१ लाख तसेच कृषीपंपधारकांकडे ७१ कोटी ५३ लाख रुपये थकीत आहे. शहरी व ग्रामीण पथदिव्यांच्या वीज बिलाची थकबाकी चांगलीच वाढली आहे. जिल्ह्यातील नगरपालिकांकडे व ग्रामपंचायती मिळून तब्बल १२९ कोटी ४७ लाख ३७ हजार रुपये थकित आहे. त्यामुळे या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पाणी पुरवठा योजना, पथदिवे आदी सर्व थकबाकीदारांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे. सध्या महावितरण बिकट आर्थिक परिस्थितीला सामोरे जात असून थकबाकी वसुलीशिवाय पर्याय नसल्याने महावितरण थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सर्वत्र करीत आहे.कर्मचाऱ्यांवरही होणार कारवाईथकबाकी वसुलीबाबत महावितरण आक्रमक झाली आहे. थकबाकीदार ग्राहकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यालयातून देण्यात आले आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीत हयगय दाखविणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांवर वसुली न झाल्यास कारवाई केली जाईल, असेही महावितरणच्या मुख्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असल्याने महावितरणने ही भूमिका घेतली आहे.