शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: May 25, 2016 01:28 IST

जिल्ह्यासह चंद्रपूर शहरातील अनेक वॉर्डात पाण्यासाठी हाहाकार सुरू असताना लिकेजद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय चंद्रपूर शहरात सुरू आहे.

मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्यासाठी अनेक वॉर्डात टाहोचंद्रपूर : जिल्ह्यासह चंद्रपूर शहरातील अनेक वॉर्डात पाण्यासाठी हाहाकार सुरू असताना लिकेजद्वारे दररोज लाखो लिटर पाण्याचा अपव्यय चंद्रपूर शहरात सुरू आहे. याकडे मनपा प्रशासन व पाणी पुरवठा कंत्राटदार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी केला आहे.एकीकळे महानगरपालिका तसेच अनेक समाजसेवी संस्थाच्या माध्यमातून शहरवासीयांना पाणी बचतीचे धडे दिले जात आहेत. तर दुसरीकळे महानगरपालिकेद्वारे टाकण्यात आलेल्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये अनेक ठिकाणी लिकेज असल्याने त्याद्वारे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र अनेक वॉर्डात दिसून येते.चंद्रपूर शहरामध्ये इरई धरणाद्वारे दररोज ४२ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकाअंतर्गत पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. परंतु, ही पाईपलाईन अनेक ठिकाणी लिकेज आहे. त्यामुळे दररोज २५.४ एमएलडी पाणी वाया जात असल्याचे राजेश बेले यांनी म्हटले आहे. त्यामुळे जेवढा पाणी पुरवठा शहरात केला जातो, त्यापैकी ५० टक्के पाणी वाया जात असल्याचे चित्र शहरात दिसून येते. (नगर प्रतिनिधी)अनेक ठिकाणी लिकेजचंद्रपुरात रामनगर पोलीस ठाण्यापासून गेलेल्या पाईपलाईनमध्ये ११ ठिकाणी, रेल्वे पूलाजवळ ४ ठिकाणी, पाणी पुरवठा कार्यालय ते जिल्हा परिषद पाणी पुरवठा अधिकारी निवासापर्यंत २ लिकेज, तुकूम परिसरातील वाहतूक कार्यालयाजवळील व्हाल्वमध्ये खूप मोठा लिकेज, बाबुपेठ परिसरात सात ठिकाणी, पठाणपुरामध्ये चार ठिकाणी, वरोरा नाका दोन ठिकाणी, जटपुरा परिसरात चार लिकेज आहेत. े नळाच्या पाण्याचा अपव्ययचंद्रपुरातील काही वॉर्डात पहाटे ४ वाजताच्या सुमारास नळ सोडले जातात. नागरिक या वेळेत साखर झोपेत असतात. त्यामुळे बहुतेक नागरिक यावेळेस पाणी भरत नाही. तर ते सकाळी ६ वाजतापासून नळाचे पाणी भरतात. परंतु, अनेकांचे नळ हे पहाटेपासूनच सुरू असतात. त्यामुळे दररोज किमान दोन तास पाणी वाया जात असते.