शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बंद कोळसा खाणीतून कोट्यवधींच्या कोळशाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:28 IST

तालुक्यातील बरांज मोकासा या भागातील कर्नाटका एम्टा ही खुली कोळसा खाण गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सुरू असताना साठवून ठेवलेला जवळपास दीड लाख टन कोळसा चोरी जात असल्याची धक्कादायक माहिती सामोर आली आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी लक्ष द्यावे : दोन वर्षांपासून खाण आहे बंदस्टिंग आॅपरेशन

विनायक येसेकर।आॅनलाईन लोकमतभद्रावती : तालुक्यातील बरांज मोकासा या भागातील कर्नाटका एम्टा ही खुली कोळसा खाण गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सुरू असताना साठवून ठेवलेला जवळपास दीड लाख टन कोळसा चोरी जात असल्याची धक्कादायक माहिती सामोर आली आहे. ‘लोकमत’ने या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता अनेक ठिकाणी वाहनांच्या चाकांच्या खुणा आढळून आल्या. आजपर्यंत या खाणीतून कोट्यवधी रुपयांचा कोळसा चोरीस गेला आहे. या प्रकारामुळे एम्टाचे सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाºयांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे.शासनाने देशातील अनेक कोळसा खाणी बंद केल्या. त्यात तालुक्यातील बरांज मोकासा येथील कर्नाटका एम्टा या खुल्या कोळसा खाणीचासुद्धा समावेश आहे. ही कोळसा खाण मार्च २०१५ ला बंद करण्यात आली. खाण सुरू असताना काढलेला कोळसा एका ठिकाणी साठवून ठेवण्यात आला. परंतु बंदीमुळे तो त्या ठिकाणी तसाच राहिला. या ठिकाणी एम्टा कंपनीच्या सुरक्षा अधिकाºयांसह ५० च्या वर सुरक्षा कर्मचारी नियुक्त करून ठेवले आहे. बंदच्या काळात त्याठिकाणी कंपनीने काढून ठेवलेला दीड लाख टन कोळसा आता हळूहळू चोरी जात आहे. या कोळशाची किंमत हजारो कोटींच्या घरात आहे. या खाणीतून रात्री जेसीबीच्या साहाय्याने ट्रकांमध्ये कोळसा भरून वणी व इतर ठिकाणी विकला जात आहे. हे काम गेल्या वर्षभरापासून सर्रास सुरू आहे. याव्यतिरिक्त दररोज पहाटेच्या वेळेस २० ते २५ दुचाकी मोटारसायकलस्वार एकाच वेळी एका गाडीवर ४-४ पोती कोळसा भरून त्याची वाहतूक करीत आहे.कोळसा वाहतुकीच्या वाहनाने अपघातही घडलेआठवडाभरापूर्वी दुचाकीने कोळसा वाहतूक करताना एका चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकी वाहनधारक गंभीर जखमी झाल्याची घटना मानोरा फाट्याजवळ घडली होती. यापूर्वीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. करिता या प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. खाण चालू असताना स्टॉक रजिस्टरमध्ये नमुद केलेला कोळसा त्याठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे आहे. आता कोळशाच्या भागाला आग लावून तो जळून राख झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे.