शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
3
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
4
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
5
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
6
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
7
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
8
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
9
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
10
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
11
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
12
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
13
ब्रम्होस: पाकिस्तानचे ११ एअरबेस उगाच नाही भेदले...; भारताला माजी राष्ट्रपतींनी दिलेली 'भेट'
14
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल
15
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
16
Jalgaon Shiv Sena Office: शिवसेनेच्या कार्यालयात भूत? कार्यकर्त्यांमध्ये घबराट, गुलाबराव पाटलांनी काढली समजूत
17
"माझा नवरा पाकिस्तानचा हेर नाही, तो तर..."; आयएसआय एजंटना मदत करणाऱ्या शाहजादची पत्नी काय म्हणाली?
18
पाकिस्तानात भिकाऱ्यांकडे बंगला, स्विमिंग पूल अन् SUV कार...; कसा चालतो हा व्यापार?
19
Shahana Fatima : नागपूरच्या लेकीची शिकागोत नेत्रदीपक कामगिरी; शहाना फातिमाने केली कमाल, मिळवलं मोठं यश
20
ज्योती मल्होत्रा प्रकरणानं चर्चा, एका गुप्तहेराला किती पैसे देतं पाकिस्तान?; डिटेल रिपोर्ट

कुटुंब नियोजन अनुदानाचा लक्षावधींचा घोटाळा

By admin | Updated: May 21, 2015 01:23 IST

तालुक्यातील औद्योगिक नगर गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात यंदा कुटुंब नियोजन आणि सुरक्षा जननी योजनेच्या अनुदानात सुमारे चार लाखांचा घोटाळा झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.

कोरपना: तालुक्यातील औद्योगिक नगर गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात यंदा कुटुंब नियोजन आणि सुरक्षा जननी योजनेच्या अनुदानात सुमारे चार लाखांचा घोटाळा झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. ग्रामीण रुग्णालयातील लिपिकाने अधिकोषातून सदर राशी काढून लाभार्र्थींना वितरित करण्याऐवजी स्वत:च राशीसह पसार झाल्याने पाचशेवर लाभार्थी आता हातत चोळत बसले आहेत.या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा अंतर्गत या केंद्रातून यंदा सुमारे ३५० महिला लाभार्र्थींच्या गडचांदूर ग्रामीण रुग्णालयातून नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या व्यतिरिक्त राजुरा तालुक्यातील देवाडा अंतर्गत काही उपकेंद्रातीलही शस्त्रक्रिया पार पडल्या. दारिद्र्य रेषेखालील महिला लाभार्थीस प्रत्येकी ६०० रुपये तर सर्वसाधारण (एपीएल) लाभार्र्थींसाठी २५० रुपये असे शासनाकडून शस्त्रक्रिया झाल्याक्षणी रोख अनुदान दिले जाते. याशिवाय शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करणाऱ्या (प्रमोटर्स) आरोग्य सेविकेस प्रत्येकी १५० रुपये रोख देण्यात येते.यंदा जिल्हा परिषदेकडून नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे कुटुंब नियोजनाचे अनुदान येण्यास उशीर झाला. त्यामुळे वेळेवर अर्थात शस्त्रक्रिया झाल्याक्षणी अनुदान वितरण झाले नाही. नेमकी हीच बाब घोटाळ्यासाठी कारणीभूत ठरली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेच अनुदान राशीसाठी अर्ज करावा लागतो. त्याच अर्जात राशी प्राप्त झाली म्हणून स्वाक्षरी केली जाते. गडचांदुरातील ग्रामीण रुग्णालयातील लिपिकाने अग्रीम स्वरूपात बऱ्याच लाभार्र्थींकडून असे राशी मिळाल्याचे अर्ज भरुन स्वत:कडे जमा केले. अनुदान येताच आपणास रोख राशी देण्यात येईल, असे लिपिकाने सांगितल्याने लाभार्र्थींचा विश्वास बसला. वारंवार चकरा मारण्याची कटकट नको म्हणून बऱ्याच महिला लाभार्थ्यांनी हे अर्ज भरुन दिले.दरम्यान, ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीनुसार तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने सदर अनुदान ग्रामीण रुग्णालयाच्या खात्यात वळते केले. त्या अनुषंगाने लिपिकाने वितरणासाठी अधिकोषातून अनुदान काढले. मात्र २० ते २५ लाभार्र्थींना अनुदान दिल्यानंतर उर्वरित राशीसह लिपिक पसार झाला. सुमारे तीन महिन्याचा कालावधी लोटूनही तो गडचांदुरात परतलाच नाही. त्यामुळे लाभार्थी आणि आरोग्य सेविकांनी ही बाब ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कळसकर यांच्या कानावर टाकली. त्यांनी लेखी तक्रारी देण्याचे सूचविले. मात्र अद्यापपर्यंत कुणीही लेखी तक्रार दिली नाही.उल्लेखनीय आहे की, अनुदानाची लक्षावधी राशी घेऊन पसार झालेल्या या लिपिकाने आरोग्य सहसंचालक कार्यालयाशी संधान साधून गडचांदुरातून थेट नागपूरला आपले स्थानांतरण करवून घेतले. आश्चर्याची बाब म्हणजे, या अपहारित राशीचा हिशेब न घेताच त्या लिपिकाला तातडीने सोडण्याचा धक्कादायक प्रकारही घडला.त्यामुळे पाणी बऱ्याच ठिकाणी मुरत असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, यंदा नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ग्रामीण रुग्णालय गडचांदूर यांच्याकडे कुटुंब नियोजनासाठी दारिद्र्य रेषेखालील लाभार्र्थींसाठी १ लाख ७३ हजार, सर्वसाधारणकरिता १ लाख आणि पुरुष नसबंदीसाठी ९ हजार असे एकूण २ लाख ८२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. याशिवाय जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थीसाठी एक लाख ३७ हजार ९०० रुपये अनुदानही वळते करण्यात आले. आशा वर्कर आणि लाभार्र्थींना अद्यापही सदर अनुदान मिळाले नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर हा घोटाळा सुमारे चार लाखावर असल्याचे आता बोलले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)