कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष हरीश शर्मा होते. मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपाध्यक्ष मीना चौधरी यांची उपस्थिती होती.
शहरातून इयत्ता दहावी तसेच बारावीत प्रथम आलेले तसेच व्हॉलिबॉल, टेबल टेनिस इत्यादी खेळामध्ये राज्य तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेले खेळाडू आँचल तितरे, कशीश कोडापे, श्रुती राऊत या गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष शर्मा यांनी बल्लारपूर नगरपालिकेची ७१ वर्षांची वाटचाल, या अवधीत शहराचा झालेला विकास, याबाबत बोलताना राज्याचे माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने शहराच्या झालेल्या विकासावर प्रकाश टाकला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष छाया मडावी, नगरसेवक सागर राऊत, अंकुबाई आदींची उपस्थिती होती.