शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांच्या गर्दीमुळे व्यापारी आनंदले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

कुंभार मोहल्ला, आझाद बाग परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच गणेशभक्त मूर्ती खरेदी करण्यासाठी येत होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी गणेशमूर्ती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तर मोठ्या मंडळांनी झगमगाट न करता गणेशाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देगणरायांच्या आगमनासाठी बाजार सजला : आज घरोघरी उत्साहात होणार गणपती बाप्पाची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या संकटामध्ये गणेशोत्सवासाठीबाजारपेठ सजली आहे. खरेदीसाठी शुक्रवारी दिवसभर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. ग्राहकांची मोठी संख्या बघून छोट्या, मोठ्या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर कोरोना संकटाच्या काळात पहिल्यांदाच हास्य फुलल्याचे बघायला मिळाले.कुंभार मोहल्ला, आझाद बाग परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच गणेशभक्त मूर्ती खरेदी करण्यासाठी येत होते. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काही सार्वजनिक गणेश मंडळांनी यावर्षी गणेशमूर्ती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तर मोठ्या मंडळांनी झगमगाट न करता गणेशाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. बच्चे कंपनीच्या आग्रहावरून काही कुटुंबीय साहित्य खेरीदीसाठी बाहेर निघाले. रात्री उशीरापर्यंत गर्दी कायम होती.गणेश मंडळांची तयारीयंदाची गणेशोत्सव कोरोनाच्या सावटात होत आहे. गणपतीच्या दहा दिवसातील उत्साहावर कोरोनाचा प्रतिबंध लागला आहे. गर्दी टाळून साध्या पध्दतीने हा सोहळा साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरातील प्रमुख मंडळांनी छोटे मंडप, मिरवणूका न काढण्याचे ठरविले आहे. तसेच आरती करताना किंवा पुजा करताना शारीरिक अंतर आणि प्रशासनाचे नियम पाळण्यात येणार आहे.२१ प्रकारच्या भाजींना मागणीबाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठे सजली आहे. इतर साहित्यासह रेडिमेड मोदकाची तसेच २१ प्रकारच्या पालेभाज्यांची मागणीही केली जात होती. अनेकांनी केवळ भाजीचीच विक्री केली.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवMarketबाजार