शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एमईएलच्या मॅगनिजची हेराफेरी

By admin | Updated: July 17, 2014 23:58 IST

विदर्भातील नामंकित एमईएल प्रकल्पातून भिलाई स्टील प्लँटसाठी जाणाऱ्या सिलिको मॅगनिजची हेराफेरी सेंट्रल एक्साईजने उघडकीस आणली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज जवळील

सेंट्रल एक्साईजची धाड : गडचिरोलीच्या जंगलात होता अड्डाचंद्रपूर : विदर्भातील नामंकित एमईएल प्रकल्पातून भिलाई स्टील प्लँटसाठी जाणाऱ्या सिलिको मॅगनिजची हेराफेरी सेंट्रल एक्साईजने उघडकीस आणली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज जवळील बोदेकसा गावाजवळील या हेराफेरीचा अड्डा नक्षल विरोधी पथकाच्या मदतीने शोधण्यात यश आले असून साडेपाच टन वजनाचे सिलिको मॅगनिज पोलिसांच्या मदतीने जप्त केले आहे.सेंट्रल एक्साईजच्या या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येथील कर चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतरची ही दुसरी मोठी कारवाई आहे. यामुळे एमईएल स्टील प्लँटमध्ये नेमके चालते तरी काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे.सेंट्रल एक्साईजच्या सूत्रांनुसार, गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नक्षल विरोधी पथकातील जवानांच्या मदतीने बोदेकसा गावाजवळील अड्ड्यावर धाड घातली. यात साडेपाच टन सिलिको मॅगनिज जप्त करण्यात आले. यासोबतच बॅग शिवण्याची शिलाई मशीन, वजनकाटाही जप्त करण्यात आला. एमईएलमधून सिलिको मॅगनिज घेऊन भीलाई स्टील प्लँटकडे निघालेला ट्रक घटनेच्या रात्री येथे रिकामा करण्यात आला होता. येथे चालणाऱ्या हेराफेरीची गुप्त माहिती सेंट्रल एक्साइजच्या अधिकाऱ्यांना होती. त्यावरून सापळा रचून ही धाड घालण्यात आल्याची माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)