शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस कार्यकर्त्यांची सहविचार सभा

By admin | Updated: September 19, 2016 00:51 IST

२०१६ मध्ये होऊ घातलेल्या राजुरा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजुरा येथील काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची सहविचार सभा ...

मंथन : निवडणुकीची पार्श्वभूमीराजुरा : २०१६ मध्ये होऊ घातलेल्या राजुरा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजुरा येथील काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची सहविचार सभा आज रविवारला स्थानिक छत्रपती शिवाजी संकुल (सुपर मार्केट हाँल) राजुरा येथे पार पडली.या सहविचार सभेचे अध्यक्ष काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अँड. अरूण धोटे, तालुका अध्यक्ष दादापाटील लांडे, नगराध्यक्ष मंगला आत्राम, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, गटनेते स्वामी येरोलवार, नगरसेवक सय्यद सतावत अली, शहर अध्यक्ष सुनील देशपांडे, माया पाकमोडे, वेकोलि इंटकचे शंकर दास, सुरेंद्र डोहे आदी उपस्थित होते.या सभेला संबोधित करताना माजी आमदार सुभाष धोटे यांनी येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीत भाजपाच्या खोट्या आश्वासनाला बळी न पडता आपल्या सदसदविवेकबुद्धीचा वापर करून राजुरा शहरात सातत्याने विकासाची गंगा आणणाऱ्या व सर्व सामान्य जनतेचे हित जोपासणाऱ्या काँग्रेस उमेदवारांनाच निवडून देवून पुनश्च राजुरा नगर परिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी आपसातील मतभेद विसरून एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी आपल्या भाषणात राजुरा नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास पक्षाचा गड कायम राखता येईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रसंगी राजुरा शहरातील अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सभेला नगरसेवक शाम बोलम, सोनाली येसेकर, प्रियदर्शनी उमरे, दिपा करमनकर, शारदा खंडाळे, अशोक देशपांडे, सेवादलाचे अध्यक्ष क्रिष्णा खामनकर, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष शब्बीर पठाण, अनु. जाती-जमाती अध्यक्ष विजय उपरे, राजीव सेना अध्यक्ष भूपिंदरसिंग धोतरा, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष गोलु ठाकरे यासह शहरातील हजारोंच्या संख्येने काँग्रेसप्रेमी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद यांनी केले. प्रास्ताविक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन संदिप आदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसच्या सर्व शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)