शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गडचांदूर तालुका निर्मितीसाठी संघर्ष समितीचे आमदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST

गडचांदूर : कोरपना व जिवती या दोन्ही तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या औद्योगिक शहर गडचांदूरला तालुक्याचा दर्जा देण्यात ...

गडचांदूर :

कोरपना व जिवती या दोन्ही तालुक्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या औद्योगिक शहर गडचांदूरला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा, यासाठी गडचांदूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने आमदार सुभाष धोटे यांना निवेदन देण्यात आले.

गडचांदूर तालुका निर्मितीची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. यासाठी संघर्ष समितीच्या वतीने अनेकदा आंदोलने केली. शासनानेसुद्धा याबाबत प्रस्ताव तयार केला आहे. गडचांदूर तालुका निर्मितीला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, पत्रकार संघाने समर्थन दिले आहे. गडचांदूर हे शहर तालुक्याच्या दृष्टीने शासनाचे सर्व निकष पूर्ण करीत आहे. गडचांदूरपेक्षा अतिशय लहान शहराला तालुक्याचा दर्जा मिळाला आहे. केवळ राजकीय पाठबळ नसल्याने तालुका निर्मितीला अडथळा निर्माण होत आहे. तेव्हा शासनाने आता तरी गडचांदूर शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी संघर्ष समितीचे संघटक उद्धव पुरी, अशोककुमार उमरे, डॉ. के. आर. भोयर यांनी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष अरुण धोटे, गडचांदूर नगर परिषदेच्या अध्यक्ष सविता टेकाम, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे, पोलीस निरीक्षक गोपाल भारती, नगरसेवक, गटनेते विक्रम येरणे, पापय्या पोन्नमवार, शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संतोष महाडोळे उपस्थित होते.