शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ३० अतिसंवेदनशील गावांमध्ये शांतता बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 22:18 IST

वनविभाग ब्रह्मपुरी व वाईल्ड लाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी वनविभागातील ३० अतिसंवेदनशील गावांमध्ये शांतता बैठकीचे आयोजन सन २०१७-१८ या कालावधीमध्ये करण्यात आले.

ठळक मुद्देगावकऱ्यांनीही सांगितल्या समस्या : विविध विषयांवर मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : वनविभाग ब्रह्मपुरी व वाईल्ड लाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी वनविभागातील ३० अतिसंवेदनशील गावांमध्ये शांतता बैठकीचे आयोजन सन २०१७-१८ या कालावधीमध्ये करण्यात आले. या बैठकांचे आयोजन गावाच्या मुख्य चौकात, जि.प. शाळा तसेच ग्रामपंचायत भवन परिसरात गावातील पुरुष, महिला, विद्यार्थी, वनविभागाचे कर्मचारी, वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाचे पदाधिकारी, गावातील वनसंवर्धनाशी निगडित विविध समित्यांच्या पदाधिकाºयांच्या उपस्थितीत करण्यात आले. सर्वांचा सहभाग या बैठकींमध्ये असावा, या उद्देशाने सायंकाळी ६ वाजताची वेळ ठरविण्यात आली.बैठकीची सुरूवात सर्वांचा परिचय करून गाव, जंगल व जमीन यांचा सहसंबंध दर्शविणारा गावाचा गुगल नकाशा प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखवण्यात आला. तसेच ताडोबा-नवेगाव व नागझिरा या मध्ये भारतातील संवधित क्षेत्रांना कशा पद्धतीने गावाचे जंगल जोडले आहे, याबाबत चर्चा करण्यात आली. मानव-वन्यजीव संघर्ष गावात होण्याचे विविध कारणे शोधण्याचा प्रयत्न बैठकीच्या माध्यमातून करण्यात आला. मुख्यत: मोह, तेंदू व इतर गौण वनोपज गोळा करताना तसेच शौचास बाहेर गेल्यास सर्वात जास्त मानव वन्यजीव संघर्ष झाल्याचे गावकºयांनी सांगितले. यावेळी गावकºयांनी घ्यावयाची काळजी यावर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. सर्वांनी शौचालय बांधणे अतिआवश्यक आहे. यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. गौण वनोपज गोळा करताना, शेतीचे काम एकट्याने न करता समुहाने करणे आवश्यक आहे, असे वाईल्ड लाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाचे फिल्ड आॅफीसर महेंद्र राऊत यांनी सांगितले. बैठकीत वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाचे पशुवैद्यकीय डॉक्टर, विज्ञान तज्ज्ञ, सामाजिक तज्ज्ञ यांनी उपस्थित राहून प्रत्येकजण त्यांच्या विषयाला घेवून गावकºयांशी चर्चा केली. एकात्मिक वाघ अधिवास संवर्धन प्रकल्प आययुसीएन, केएफडब्ल्यू, कोआॅपरेशन, वनविभाग व वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया यांच्या मदतीने जानेवारी २०१७ पासून या भागात आरआरटी व पीआरटी टीम काम करीत आहे. गावकºयांनी त्यांचे प्रश्न बैठकीमध्ये सांगितल्याने वनकर्मचाºयांच्या उपस्थितीमध्ये त्यावर चर्चा करण्यात आली.