शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल ऑक्सिजन ऑडिट पथकाने १२ त्रुटींवर ठेवले बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST

चंद्रपूर : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना जीवदान देणारे ऑॅक्सिजन एक औषधच आहे. त्यामुळे औषध विज्ञान आरोग्य निकषानुसार जिल्ह्यातील डीसीएच ...

चंद्रपूर : कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना जीवदान देणारे ऑॅक्सिजन एक औषधच आहे. त्यामुळे औषध विज्ञान आरोग्य निकषानुसार जिल्ह्यातील डीसीएच व डीसीएचसी हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑक्सिजन वितरण होते की नाही, याबाबत नुकतेच ऑडिट झाले. ऑडिट पथकाने १२ त्रुटींवर बोट ठेवून त्या

सात दिवसांत दूर करण्याच्या सूचना दिल्या.

चंद्रपूर जिल्ह्यात ३२ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. सध्या स्थितीत ३० मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने उर्वरित दोन मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठ्याचा प्रश्न सोडविला. त्यामुळे सध्या तरी मागणीच्या तुलनेत ऑक्सिजन तुटवडा नाही. फक्त ऑक्सिजनयुक्त बेड्सची समस्या तातडीने सोडविल्यास कोविड रुग्णांना उपचार होऊ शकतात. यातून बाधित मृतांच्या संख्येलाही ब्रेक लागू शकतो. जिल्ह्यात ५ डीसीएच व ३१ डीसीएचसी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयांना ३० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यामध्ये ३१ खासगी रुग्णालयाचाही समावेश आहे. उपलब्ध असलेला ऑक्सिजन रुग्णांना योग्यरीत्या मिळतो किंवा नाही, यासाठी टेक्निकल व क्निनिकल ऑडिट करण्यात आले. ऑडिट पथकाने १२ त्रुटींवर बोट ठेवले. या त्रुटी सात दिवसांत दूर करावे आणि नवीन पॅरमॅटनुसार दररोज माहिती सादर करण्याचे निर्देश हॉस्पिटलला दिले. शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करताना सुरुवातीलाच लक्ष घालण्यात आले. त्यामुळे त्रुटींची संख्या कमी असल्याचे समजते.

अशा आहेत त्रुटी व सूचना

ऑक्सिजन वितरणाचे लॉकबुक ठेवावे

तात्पुरते नव्हे, तर ॲन्युअल मेन्टेन्स करावे

ऑक्सिजन सिलिंडर व्यवस्थित लावावे

व्हाॅल्वद्वारे रुग्णांना योग्य पुरवठा होतो काय

सरासरीपेक्षा जास्त ऑक्सिजन देऊ नये

प्रशिक्षित मनुष्यबळ नियुक्त करावे

ऑक्सिजन गळती बंद करावी

दररोजचा अहवाल तयार करावा

ऑक्सिजन संयंत्राची पाहणी व व्यवस्थापन

ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड्सची माहिती द्यावी

परिचारिकांना प्रशिक्षण द्यावे

ऑक्सिजनबाबतच्या सर्व यंत्रणा अपडेट ठेवा

असे आहे ऑडिट पथक

राज्याच्या तांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे संचालक व व्यावसायिक शिक्षण संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मेडिकल ऑक्सिजन पथक स्थापन करण्यात आले. या पथकात चंद्रपूर येथील शासकीय तंत्रनिकेतन, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ही समिती दररोजच अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करते. क्निनिकल ऑडिटसाठी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा सहभाग असतो.

एका ऑक्सिजन प्लांटचे टेंडर

कोविड रुग्णांना तत्काळ ऑक्सिजन उपलब्ध व्हावे, यासाठी तालुकास्थळी १० पीसीए प्लांट आणि जिल्हास्थळी क्रायोजेनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. यातील एका प्रकल्पाचे टेंडर निघाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात काम सुरू होण्याची शक्यता आहे.

कोट

कोविड रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये. जिल्ह्याला उपलब्ध होणारा ऑक्सिजन डीसीएच व डीसीएचसी रुग्णालयांनी नियमानुसारच वितरण करावे. अजिबात गळती होऊ नये, यासाठी ऑक्सिजन ऑडिट करण्यात आले. त्रुटी आढळल्यानंतर त्या सात दिवसांत दुरुस्ती करण्याच्या सूचना तज्ज्ञ पथकाने दिल्या. टेक्निकल व क्निनिकल ऑडिटमुळे ऑक्सिजन गळती दूर करून योग्य व्यवस्थापन करता येईल. कोविड रुग्णांना वैद्यकीय निकषानुसार ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

- मनोहर गव्हाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी ऑक्सिजन वितरण, चंद्रपूर