तळोधी (बा.) : चंद्रपूर येथे नुकतेच वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या महाविद्यालयाला कोणाचे नाव द्यावे यावरुन अनेक संघटना व राजकीय पक्षांची आपआपले मत प्रदर्शित करीत आहेत. परंतु चंद्रपूर जिल्ह्यासाठी भूषणावह असलेली व्यक्ती व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.सा. कन्नमवार यांचे नाव वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात यावे, अशी मागणी तळोधी (बा.) येथील वैद्यकीय असोसिएशनचे डॉ. नीळकंठराव जोकार यांनी केली आहे.मा. सा. कन्नमवार यांचे चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रगतीकरीता भरीव योगदान आहे. त्याच्या निस्पृह सेवेमुळे प्रत्येक राजकीय पक्षात व संघटनेत त्यांना मानणारा मोठा वर्ग आजही उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांचे नाव चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला दिल्यास जिल्ह्याचा गौरवच वाढणार आहे, असे जोकार यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
वैद्यकीय महाविद्यालयाला मा. सा. कन्नमवार यांचे नाव द्या
By admin | Updated: September 20, 2015 01:38 IST