शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सुधीर मुनगंटीवारांची मध्यस्थी, मनपाच्या २०६ सफाई कंत्राटी कामगारांना दिलासा

By राजेश भोजेकर | Updated: April 4, 2023 13:13 IST

सर्व सफाई कामगार लागले सफाईच्या कामाला

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत सफाईची कामे करणाऱ्या सुमारे २०६ सफाई कंत्राटी कामगारांना कंत्राटदार कामावरून कमी करण्यात येणार असल्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. या कार्यवाहीने आता आपल्या कुटुंबांचे पालन पोषण कसे करायचे, असा यक्षप्रश्न या कामगारांसमोर उभा ठाकला होता. ही बाब राज्याचे सांस्कृतिक कार्य व वने मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आली. त्यांनी यामध्ये तातडीने लक्ष देत तोडगा काढल्याने या कामागारांचा प्रश्न मार्गी लागला आहे.

मागील काही दिवसांपासून या कामगारांनी कामावरून कमी करण्याच्या विरोधात सफाईची कामे बंद केली होती. यामुळे चंद्रपूर शहरात अनेक भागातील कचराकुंड्यांमध्ये कचरा गोळा झाला होता. शहराची स्वच्छता वेठीस धरल्यागत स्थिती निर्माण झाली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माजी उपमहापौर राहुल पावडे यांना सफाई कंत्राटी कामगारांसोबत थेट चर्चा करायला सांगितले. या चर्चेतून त्यांनी एकाही कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात येणार नाही, अशी ग्वाही कामगार द्यायला सांगितली. आणि या ग्वाहीनंतर सफाई कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आता आपल्याला कामावरून कमी करण्यात येणार नसल्याचा दिलासा त्यांना मिळाला. अखेर आजपासून या कंत्राटी कामगारांनी सफाईच्या कामाला हात लावला आहे.

मागील पंधरा दिवसांपासून आम्ही कामावर जात नव्हतो. आम्हाला कामावरच घेतले जात नव्हते. यामुळे आमच्या कुटुंबियांची मोठी उपासमार होत होती. आमच्या या गंभीर प्रश्नावर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल पावडे यांच्या माध्यमातून बैठक बोलावली आणि आमचा प्रश्न निकाली काढला. आजपासून जवळपास सर्वच २६० कंत्राटी कामगार कामावर रुजू झाले आहेत. १६० जणांना सफाई कंत्राटी कामगार म्हणून कामावर घेणार आहेत तर उर्वरित कामगारांना महानगरपालिकेची अन्य कामे दिली जाणार आहेत. यामुळे कोणीही कमी होणार नाही, अशी ग्वाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याने आमचा प्रश्न आता सुटला आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारchandrapur-acचंद्रपूरLabourकामगार