शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एमईसीएलचा विस्तारित प्रकल्प होणार

By admin | Updated: July 1, 2017 00:41 IST

येथील चंद्रपूर फेरो अलॉय प्रकल्पाच्या (एमईएल) विस्तारीकरणाबाबत भिलाई येथील सेलच्या कार्यालयात बैठक झाली.

सीईओंचे संकेत : भिलाई येथे प्रशासन व कामगार संघटनेची चर्चालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील चंद्रपूर फेरो अलॉय प्रकल्पाच्या (एमईएल) विस्तारीकरणाबाबत भिलाई येथील सेलच्या कार्यालयात बैठक झाली. यावेळी विस्तारित प्रकल्पाबाबत भिलाई प्रकल्पाचे मुख्य कार्यपालन अधिकारी आणि चंद्रपूरच्या महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट कामगार युनियन यांच्यात चर्चा झाली. भविष्यातील गरज लक्षात घेऊन एमईएलचा स्वत:चा वीज प्रकल्प आणि कच्चा माल पुरवठा करणारा प्रकल्प तयार करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणण्यात आले.यावेळी स्टिल अथॉरिटी आॅफ इंडिया लिमिटेडची कंपनी भिलाई स्टिल प्लांटचे मुख्य कार्यपालक अधिकारी एम. रवी यांनी विस्तारीकरणाबाबत पूर्ण मदत करू व याकरिता पैशाची कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले.सी.एफ.पी. ला(चंद्रपूर फेरो अलॉय प्रकल्प) कच्च्या मालाकरिता स्वत:च्या खाणी नाहीत. स्वत:चा वीज प्रकल्प नाही. विजेची गरज ४५ मेगावॅट आहे. कंपनीमध्ये ४५ एमव्हए क्षमतेच्या तिसऱ्या सबमर्ज्ड आर्क फर्नेसच्या स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कच्चा माल व विजेची गरज जास्तच राहणार आहे. विजेच्या व कच्च्या मालाच्या दरात दिवसेंदिवस होणारी वाढ सीएफपीच्या प्रगतीच्या आड येणारा मुख्य अडथळा ठरणार आहे. त्यावर उपाय म्हणजे कच्च्या मालाकरिता स्वत:च्या खाणी व विजेची गरज पूर्ण करण्याकरिता आवश्यक क्षमतेचा स्वत:चा वीज प्रकल्प असणे गरजेचे आहे. तसेच सीएफपीकडील ४.२ मेगावॅटचा प्रकल्पाला पूवर्वत सुरू करणे आवश्यक आहे. तेव्हाच कंपनीची प्रगती व पर्यावरणाचे संतुलन कायम राखणे शक्य आहे, अशी मागणी युनियनतर्फे करण्यात आली. त्यावर रवी यांनी सीएफपीचे विस्तारीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. त्यामध्ये ४५ मेगावॅट क्षमतेच्या फर्नेसला लवकरात लवकर सुरू करणे व आवश्यक क्षमतेचे विद्युत संयंत्र चंद्रपूर फेरो-अलॉय प्लांटमध्ये लावण्याची सूचना केली. कच्च्या मालाबाबत सेलची योजना असल्याचे तसेच कॉस्ट आॅफ प्रॉडक्शन कमी करण्याबाबत युनियन व लोकल मॅनेजमेटनी मिळून प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्य कार्यपालक अधिकारी रवी यांनी दिले. यावेळी संपूर्ण सेलच्या बाबतही माहिती देण्यात आली.बैठकीला महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट कामगार युनियनशी भिलाई येथे झालेल्या बैठकीमध्ये युनियनचे महासचिव चंद्रशेखर पोडे व कार्याध्यक्ष बी.के. मून सोबत भिलाई स्टिल प्लांटच्या इंटक युनियनचे नेता एन.एन. राव, उपाध्यक्ष नरेश बनकर, सहसचिव दिवाकर मोसमवार व सल्लागार विजय चौहान उपस्थित होते.