चंद्रपूर : यंदा अस्मानी संकटाच्या माऱ्याने संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हाती आले नाही. याचा फटका शेतीपूरक व्यवसाय व शेतीशी निगिडत व्यवसायांवरही पडला आहे. शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे लोहार कुटुंबीयांचा भाता थंडावला असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.यंदाच्या अत्यल्प पावसाने खरीप हंगाम हातचा गेला. रबी हंगामातही अवकाळी पाऊस आणि तुरळक गारिपटीचा तडाखा बसला. यामुळे शेतीसह पूरक व जोड उद्योगधंदे अधोेगतीच्या मार्गावर आहेत. शेती निगिडत अवजारे तयार करणाऱ्या लोहार कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे. भात्यासमोर तासन्तास बसून ऐरणीच्या देवाला स्मरत अवजारे घडवून लोहारा समाज पोटासाठी चार घास गोळा करतो. गावोगाव भ्रमण करत पाल ठोकून निवारा मांडणारे लोहार बांधव शेतकऱ्यांसाठी विळा, कोयते, कुऱ्हाडी, वखर व डवऱ्याची पास, कोळपी, कुदळ आदी अवजारे निर्मिती व दुरु स्ती करून उदरनिर्वाह चालवित असतात. एका गावातील कामे संपली की दुसऱ्या गावांत अशी मजल दरमजल करीत ही कुटुंबे रोजगाराच्या मागे फिरत जातात. भंडारा तालुक्यात या समाजाची ५-१० कुटुंबे वास्तव्यास आहेत. ही सर्व कुटुंबे अनेक वषार्पासून भंडारा येथील घटक बनली आहेत. परिसरातल्या शेतकऱ्यांची अवजारे तयार करून किंवा दुरुस्त्या करून ही कुटुंबे आपला उदरिनर्वाह चालवितात. परंतु यावर्षी शेतकरी हवालिदल झाला आहे. शेतीच्या अवजाराची कामे बंद आहेत. पेरणीच्या काळात फार थोडी चिल्लर कामेच आता शेतकरी करतील, असे निराशाजनक मत त्यांनी व्यक्त केले. बैलगाड्यांची लाकडी चाकेही आता इतिहास जमा होवून त्यांची जागा लोखंडी चाकांनी घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)
यांत्रिकीकरणात लोहारांचा भाता थंडावला
By admin | Updated: May 22, 2015 01:25 IST