शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महापौर आरक्षणात पुरुषांना फटका

By admin | Updated: February 4, 2017 00:32 IST

राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी मुंबई येथे काढण्यात आली.

ओबीसी महिला राखीव : पुन्हा एकवार भंगले स्वप्नचंद्रपूर : राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी मुंबई येथे काढण्यात आली. यात चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौर पद पुन्हा ओबीसी महिलासाठी राखीव आल्याने या आरक्षणाकडे लक्ष ठेवून असलेल्या पुरुषांना दुसऱ्यांदा फटका बसला आहे. मागील पंचवार्षिकमध्येही हे पद महिलांसाठीच राखीव होते. यावेळीही महिलांसाठीच राखीव असल्याने इच्छुक पुरुषमंडळीचे स्वप्न पुन्हा एकवार भंगले आहे.चंद्रपूर महानगरपालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. राज्यभरातील महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होत आहे. मात्र चंद्रपूर महानगरपालिका विलंबाने अस्तित्वात आल्याने या महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होईल, असा अंदाज आहे. चंद्रपूर शहराची लोकसंख्या तीन लाख २० हजार ३७९ आहे. यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ६१ हजार १६४, अनुसूचित जमातीची लोकसंख्या २५ हजार ७९४ इतकी आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३३ प्रभाग पाडण्यात आले होते. या ३३ प्रभागातून ६६ नगरसेवक निवडून द्यायचे होते. याप्रमाणे मतदारांनी एका प्रभागातून दोन नगरसेवक निवडून दिले. मात्र यावेळी यात बदल झाला आहे. २२ डिसेंबर २०१६ रोजी चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी शासनाने पूर्वीच्या प्रभाग रचनेत बदल केला आहे. सध्या अस्तित्वात असलेले ३३ प्रभाग मोडीत काढून नव्याने १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यात १७ प्रभागापैकी १५ प्रभागात प्रत्येकी चार नगरसेवक तर उर्वरित दोन प्रभागात तीन नगरसेवक, असे एकूण ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. दरम्यान, जुन्या ३३ प्रभागाचे रुपांतर १७ प्रभागामध्ये केल्यामुळे नगरसेवकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. यात अनेक नगरसेवकांच्या प्रभागातील बहुतांश भाग दुसऱ्या प्रभागात गेला आहे. सिव्हील लाईन हा प्रभाग आता जटपुरा प्रभागात विलीन झाला आहे. या सिव्हील लाईन प्रभागातील मित्रनगर परिसर वडगाव प्रभागात तर सिंधी कॉलनी परिसर नगिनाबागमध्ये गेला आहे. पूर्वी नगिनाबाग प्रभागात असलेला जगन्नाथबाबा नगर, रेव्हन्यू कॉलनी, जीवनज्योती कॉलनी हा परिसरही वडगाव प्रभागात विलीन झाला आहे. यासोबतच पूर्वीच्या बाजार वॉर्ड प्रभागातील काही भाग महाकाली प्रभागात गेला आहे. विशेष म्हणजे, असा प्रकार जवळजवळ सर्वच प्रभागाबाबत घडला आहे. प्रस्थापित नगरसेवकांनी पाच वर्ष ज्या परिसरात कामे केली, नागरिकांशी जनसंपर्क वाढविला, नेमका तोच परिसर दुसऱ्या प्रभागात गेल्याने यंदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या विद्यमान नगरसेवकांची डोकेदुखी वाढली आहे. या प्रभाग रचनेवर काही नगरसेवकांनी आक्षेपही नोंदविला आहे. दरम्यान, आज गुरुवारी महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात चंद्रपूर महापौर पद पुन्हा ओबीसी महिलासाठी राखीव झाले आहे. मागील पंचवार्षिकमध्ये पुरुषांना आरक्षणामुळे महापौर पद उपभोगता आले नाही. त्यामुळे यावेळीतरी तशी संधी मिळेल म्हणून अनेकजण या आरक्षणाकडे लक्ष ठेवून होते. मात्र यावेळीदेखील त्यांच्या स्वप्नांचा आरक्षणाने चुराडा केल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे इच्छुक महिला उमेदवारांमध्ये मात्र आनंदोत्सव साजरा होत आहे. (शहर प्रतिनिधी)अमृतकर बनल्या पहिल्या महापौरमहानगरपालिकेच्या स्थापनेनंतर महापौर पद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. त्यामुळे काँग्रेसच्या संगीता अमृतकर या चंद्रपूरच्या पहिल्या महापौर म्हणून विराजमान झाल्या. संगीता अमृतकर यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली. यात पुढील अडीच वर्षांसाठी महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित झाले. पुन्हा पुरुषांचे स्वप्न भंगले. त्यावेळी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या राखी कंचर्लावार यांनी भाजपात प्रवेश करून महापौर पदी विराजमान झाल्या.