शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

माथरा पाणीपुरवठा नळयोजना ठरणार दिव्यास्वप्नच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

: नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचणार केव्हा? प्रकाश काळे गोवरी : माथरा येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्ण असल्याने गेल्या ...

: नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचणार केव्हा?

प्रकाश काळे

गोवरी

: माथरा येथील पाण्याच्या टाकीचे बांधकाम अपूर्ण असल्याने गेल्या १२ वर्षांपासून गावकऱ्यांना नळ योजनेच्या पाण्यापासून वंचित राहण्याची दुर्दैवी वेळ प्रशासनाने आणली आहे. आता उन्हाळा सुरू झाल्यानंतरही गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.

राजुरा तालुक्यातील माथरा येथे गावकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी व नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी २००९ मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. आजघडीला तब्बल १२ वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाणीपुरवठा सारख्या नागरिकांचे भले करणाऱ्या योजनेची पाणीपुरवठा विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे पार माती झाली आहे. मध्यंतरी पाणीपुरवठा नळ योजनेच्या टाकीचे स्विचरूम विषयी गावकऱ्यात चांगलाच वाद चिघळला होता. मात्र मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला. माथरावासियांना लवकर पाणी मिळावे,यासाठी गावामध्ये नळ योजनेची भूमिगत पाईप लाईन टाकण्यात आली. आता आपल्या घरापर्यंत पाणी पुरवठा नळ योजनेचे पाणी पोहचेल म्हणून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मात्र या पाणी पुरवठा नळ योजनेला अल्पावधीतच ग्रहण लागल्याने गावकऱ्यांच्या भल्यासाठी राबविलेली चांगली योजना शासनाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे कुचकामी ठरली. आजघडीला मुख्य रस्त्यालगत उभ्या असलेल्या या टाकीचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. ग्रापंचायत व पाणीपुरवठा समितीच्या देखरेखीखाली पाणीपुरवठा नळ योजनेचे काम सुरू होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने पाणी पुरवठा योजनेचे हे काम पाणीपुरवठा विभागाकडे हस्तांतरित केल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने टाकीचे अपूर्ण अवस्थेत असलेले बांधकाम पूर्ण करून माथरावासियांची तहान भागवावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

कोट

माथरा येथे १२ वर्षांपूर्वी पाणी पुरवठा योजनेच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागले. ग्रामपंचायतीने सबंधित विभागाकडे टाकीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र अजूनही टाकीचे बांधकाम अपूर्ण असून तातडीने टाकीचे बांधकाम पूर्ण करावे.

-लहुजी चहारे माजी सरपंच, माथरा.