शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मार्शल प्लॅन घेऊन शेतकरी संघटना पुन्हा मैदानात

By admin | Updated: April 14, 2015 01:09 IST

सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर सडकून टीका करीत शेतकरी संघटना पुन्हा ‘मार्शल प्लॅन’ घेऊन नव्याने मैदानात

राज्यभर दौरे : देशव्यापी आंदोलन उभारण्याचा इशाराचंद्रपूर : सरकारच्या शेतकऱ्यांविषयक धोरणावर सडकून टीका करीत शेतकरी संघटना पुन्हा ‘मार्शल प्लॅन’ घेऊन नव्याने मैदानात उतरली आहे. या अंतर्गत राज्यभर दौरे करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आणि देशव्यापी आंदोलन उभारण्याचे नियोजनही शेतकरी संघटनेने केले आहे.शेतकरी संघटनेच्या जिल्हास्तरीय बैठकीसाठी राज्यस्तरीय पदाधिकारी सोमवारी चंद्रपुरात आले असता झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मार्शल प्लॅन जाहीर केला. यावेळी राज्याध्यक्ष गुणवंत पाटील हंबरडेकर, राज्य महिला आघाडी अध्यक्ष शैलजा देशपांडे, प्रांताध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप प्रामुख्याने उपस्थित होते. मार्शल प्लॅन संदर्भात माहिती देताना गुणवंत पाटील हंबरडेकर म्हणाले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे अर्थात कर्ज व वीज बिल संपविणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी पुन्हा पतपुरवठा करणे आणि शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी उत्पादन मालाला रास्त भाव सरकारने जाहीर करणे या तीन प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचा हा मार्शल प्लॅन आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सरकारने स्वातंत्र देऊन त्यांच्या जीवनमानातील हस्तक्षेप सरकारने संपवायला हवा. देशावर झालेले कर्ज सरकारच्या चुकीमुळे असले तरी त्याचा भुर्दंड मात्र शेतकरी सहन करीत आहेत. सरकारने कर्जमाफी देतानाही सावकाराचेच भले कसे होईल, याचाच अधिक विचार केला. सावकारांना वैध करून त्यांना पैसा वाटण्याचे काम या सरकारने केल्याने सावकारांचे व या सरकारचे लागेबांधे असल्याची शंका येते, असेही ते म्हणाले.नव्या सरकारच्या काळात बदल दिसेल अशी अपेक्षा होती, मात्र धर्मकारणावरच अधिक चर्चा रंगलेली दिसते. हे सरकार उद्योपतींच्या हितरक्षणासाठीच काम करत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्विकारल्याशिवाय गत्यंतर नाही, असे ते म्हणाले.अ‍ॅड. चटप म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गावातील चाय पे चर्चा कार्यक्रमात शेतकऱ्यांना विकासाचा शब्द दिला होता. मात्र सत्तेत आलेल्या त्यांच्याच सरकारातील मंत्री नितीन गडकरी यांनी, शेतकऱ्यांनी देवावर आणि सरकारवर अवलंबून राहू नये, असे जाहीर भाष्य करून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. शेतकऱ्यांची अन्न सुरक्षा धोक्यात आणण्याचे काम हे सरकार करीत आहे. शेतीव्यवसाय धोक्यात आणून उद्योगपतींच्या हितरक्षासाठी धावणारे हे सरकार असल्याचा आरोही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला रामराव कोंडेकर, प्रा. अनिल ठाकूरवार, प्रभाकर दिवे, अरविंद गाठे, श्रीधर बलकी, दिवाकर माणूसमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)