शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मारोडा आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 23:39 IST

स्व. मा. सा. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे, असे असतानाही जिल्हा प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे.

ठळक मुद्देरुग्णांना अशुद्ध पाणी : कर्मचाºयांचा मुख्यालयाला खो

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : स्व. मा. सा. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे, असे असतानाही जिल्हा प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे.मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित वैद्यकीय अधिकारी नाही. यामुळे उपकेंद्रातील डॉक्टरांना येवून रुग्णसेवा करावी लागत आहे. या आरोग्य केंद्रात अस्वच्छता पसरलेली असून रुग्णांना अशुद्ध पाणी पुरवठा करीत असल्याचे बोंब प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरु आहे. याबाबत बुधवारी ग्रामसभा घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.मूल तालुक्यातील मारोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील तीन ते चार महिन्यांपासून नियमित वैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे प्रशासकीय आणि वित्तीय कामकाज पाहण्यासाठी राजोली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चरपे यांची प्रतिनियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्रात केली आहे. मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मारोडा, कोसंबी, चिचाळा, राजगड आणि भादुर्णी असे पाच उपकेंद्र सुरु आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही डॉक्टर आणि कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. यामुळे आलेल्या रुग्णांना मूल, चंद्रपूर अथवा सिंदेवाही किंवा जवळ असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून उपचार करावा लागत आहे. स्व. मा. सा.. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना अशुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे. त्यासोबतच येथील वैद्यकीय अधिकारी रुग्णांशी सौजन्याने बोलत नाही. यामुळे मारोडा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंबंधाने ग्रामपंचायतीने बुधवारी ग्रामसभेचे आयोजन केले होते. सदर ग्रामसभेत नागरिकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतलेला आहे.मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. पेंदोर आणि डॉ. घाटे यांची नियुक्ती शासनामार्फत करण्यात आलेली आहे. मात्र काही महिन्यापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्रात येत नसल्यामुळे रुग्णांना बाहेरगावी जावून उपचार करावा लागत आहे. मूल तालुक्यातील मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अनेक कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. या केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य पुन्हा धोक्यात येते.रात्र पाळीत रुग्णांवर उपचार नाहीमारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील काही डॉक्टर व कर्मचारी रात्र पाळीत आरोग्य केंद्रात उपस्थित राहत नाही. त्यामुळे रात्र पाळीत उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मूल अथवा चंद्रपूरला जावून उपचार करावा लागत आहे.कारभार वाºयावर: पप्पू पुल्लावारमा.सा. कन्नमवारांची कर्मभूमी असलेल्या मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कारभार वाºयावर सुरु आहे. आरोग्य कर्मचारी आलेल्या रुग्णांशी सौजन्याने बोलत नाही. डॉक्टरांअभावी अनेक रुग्णांना मूल, चंद्रपूर येथे जाऊन उपचार करावे लागत आहे. याबाबत अनेकदा तालुका वैद्यकीय अधिकाºयांकडे तक्रार केली. परंतु तालुका वैद्यकीय अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याची प्रतिक्रिया मारोडा ग्रामपंचायतीचे सदस्य पप्पू पुल्लावार यांनी दिली.पर्यायी व्यवस्था केली आहे : डॉ. मेश्रामप्राथमिक आरोग्य केंद्रातील विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो, त्या विहिरीमध्ये ब्लिचिंग पाऊडर टाकण्यासाठी ग्रामपंचायतीशी पत्रव्यवहार करणार आहे. आरोग्य केंद्रातील डॉ. पेंदोर आणि डॉ. घाटे हे गैरहजर आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून तीन डॉक्टरांची प्रतिनियुक्ती मारोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेली असून त्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश दिलेले आहे, अशी प्रतिक्रीया तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम यांनी दिली.