शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कापूस खरेदीसाठी पणन महासंघ राज्यभरातील केंद्रांवर उभारणार शेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 14:45 IST

कापूस खरेदी बंद होऊ नये म्हणून कापूस ठेवण्याकरिता राज्यभरातील कापूस केंद्रावर बाजार समितीकडून तात्पुरते शेड उभारले जाणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासापाऊस आला तरी खरेदी बंद होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हमी भावाने पणन महासंघाने कापसाची खरेदी सुरू केली. सध्या शेतकऱ्यांच्या घरातच कापूस आहे. जिनिंगमध्ये कापूस ठेवण्यास पुरेसे शेड नसल्याने पावसाळ्यात कापूस खरेदी करून कसा ठेवावा, असा प्रश्न उपस्थित झाल्याने खरेदी बंद झाली. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करू लागले. आता कापूस खरेदी बंद होऊ नये म्हणून कापूस ठेवण्याकरिता राज्यभरातील कापूस केंद्रावर बाजार समितीकडून तात्पुरते शेड उभारले जाणार आहे.

वरोरा परिसरात कापसाचे उत्पादन निघताच बाजार भाव कोसळले. त्यामुळे कापसाला हमी भाव मिळावा, याकरिता हजारो शेतकऱ्यांना कापूस उत्पादक पणन महासंघाकडे नोंदणी केली. हमी भावाची कापूस खरेदी संथगतीने सुरू होती. पणन महासंघाकडे अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यातच टाळेबंदीमध्ये अनेक दिवस कापूस खरेदी बंद होती. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता असलेल्या उपाययोजना करून हमी भावाने कापूस खरेदी सुरू करण्यात आली. त्यानंतर अकाली पाऊस पडल्याने खरेदी केलेला कापूस व गाठी भिजल्या. यात पणन महासंघाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर कापूस खरेदी काही दिवसांकरिता बंद करण्यात आली.

कापूस खरेदी केल्यानंतर शेड असलेले गोदाम कापूस व गाठीने हाऊसफुल्ल झाले. त्यानंतर अनेक कापूस केंद्रावर खरेदी सुरू झाली. परंतू ग्रेडरची कमतरता असल्याने केंद्र मिळूनही कापूस खरेदी संथगतीने सुरू होती. यावर प्रशासनाने पर्याय शोधत कृषी विस्तार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देवून ग्रेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. पण शेतकऱ्यांच्या घरात कापूस गोदामे फुल्ल व पाऊस सुरू झाला. त्यामुळे हमी भावाने कापूस खरेदीवर चिंतेचे सावट पसरले. यावर पर्याय म्हणून बाजार समित्यांच्या वतीने कापूस खरेदी केंद्रावर लाखो रुपये खर्च करून तात्पुरते शेड उभारून हमी भावाने खरेदी झालेला कापूस ठेवल्या जाणार आहे. यामुळे हमी भावाने कापूस विक्रीकरिता प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

हमी भावाने कापूस विक्रीकरिता हजारो शेतकरी नोंदणी करून प्रतीक्षेत आहेत. पावसाळा सुरू झाल्याने कापूस ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला. परंतु शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कापूस ठेवण्याकरिता तात्पुरते शेड उभारले जाणार आहे.- राजेंद्र चिकटे, सभापतीकृषी बाजार समिती, वरोरा

टॅग्स :cottonकापूस