शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पणन महासंघ खरेदी करणार दररोज ८५ हजार क्विंटल कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 21:46 IST

या हंगामातही सीसीआय व पणन महासंघाने कापूस खरेदीची तयारी सुरू केली. ग्रेडरची कमतरता असल्याने या हंगामात ३० केंद्र तसेच ६० ते६५ जिनिंगच्या माध्यमातून कापूस खरेदी होवू शकते.

ठळक मुद्दे३० खरेदी केंद्रांचीच शक्यता खरेदीचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गतवर्षीच्या हंगामात कापूस खरेदी केंद्रांची संख्या कमी असल्याने वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, या हंगामातही ३० केंद्राच्याच माध्यमातून दररोज ८५ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने याबाबत अद्याप नियोजन जाहीर केले नाही.महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने मागील हंगामात ९२ केंद्र तसेच १९२ जिनिंगच्या माध्यमातून ९५ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली होती. यावर्षी सरकारने कापसाचा हमीभाव ५ हजार ८२५  जाहीर केला आहे. त्यामुळे या हंगामातही सीसीआय व पणन महासंघाने कापूस खरेदीची तयारी सुरू केली. ग्रेडरची कमतरता असल्याने या हंगामात ३० केंद्र तसेच ६० ते६५ जिनिंगच्या माध्यमातून कापूस खरेदी होवू शकते. दररोज सरासरी ७५ हजार क्विंटल कापसावर प्रक्रिया करून ३० केंद्रांच्या माध्यमातून १५ हजार गाठी तयार केल्या जावू शकतात, अशी माहिती सूत्राने दिली.राज्यातील कपाशीचे क्षेत्र ४१ लाख हेक्टरराज्यातील कपाशीचे क्षेत्र ४१ लाख हेक्टर आहे. कपाशीचा दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक पेरा असलेले १४० तालुके आहेत. सद्यस्थितीत बाजारातील कापसाचे दर ३ हजार ५०० ते ४ हजार ५०० प्रति क्विंटल आहे. सरकारने २०२०-२१ करिता कापसाचा हमीभाव प्रतिक्विंटल ५ हजार ८२५ जाहीर केला आहे.ऑक्टोबरअखेर खरेदीची शक्यतायंदाच्या हंगामातील कापूस खरेदी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीला सुरू होण्याची शक्यता आहे. मेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जावू शकतो. सध्या ३० केंद्रांचाच प्रस्ताव आहे. मात्र पायाभूत सुविधा निर्माण केल्यास केंद्रांची संख्या वाढू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत काय निर्णय होते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :cottonकापूस