कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाला आळा घालण्याच्या उद्देशाने शासनाने संचारबंदी लागू केली. जीवनावश्यक दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेत या वेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. यावेळेत फळ विक्री, भाजीपाला विक्री सुरू असते. या निर्णयामुळे भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेत्यांना फटका बसला आहे. सकाळी बाजारपेठेतून माल आणेपर्यंत ८ वाजतात आणि भाजीपाला विक्रीस सुरुवात होईपर्यंत ११ वाजतात. त्यामुळे आणलेल्या मालाचीही विक्री होत नाही. त्यामुळे गुंतवणूक केलेली रक्कमही वाया जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली मदतीचा हातभार लागणार होता. जिल्ह्यातील नोंदणीकृत फेरीवाल्यांना दीड हजार रुपये मिळणार होते. जिल्हात १५०० च्या जवळपास फेरीवाले आहेत. मात्र, संचारबंदीचा दुसरा टप्पा संपत आला तरी जिल्हातील फेरीवाल्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना मदतीची प्रतीक्षा लागून आहे.
---
जिल्ह्यातील नोंदणीकृत फेरीवाले १५००
नोंदणी नसलेल्यांची संख्या २०००
----------
बॉक्स
दीड हजार लाभार्थ्यांना कर्ज योजनेचा लाभ
लॉकडाऊन कालावधीमध्ये छोट्या व्यावसायिकांना पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना राबविण्यात आली. या योजनेतंर्गत छोट्या व्यावसायिकांना दहा हजार रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. यासाठी चंद्रपूर मनपा क्षेत्रात सुमारे चार हजार जणांनी अर्ज केले होते. यापैकी दीड हजार जणांना या योजनेचा लाभ देण्यात आला असल्याची माहिती आहे.
--------
कोट
शासनाने घोषणा केलेली मदत मिळाली असती तर थोडा हातभार मिळाला असता. मात्र अद्यापही मदत देण्यात आली नाही. व्यवसायही ठप्प असल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.