शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा नोकरीची, व्यवहाराची झाली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:39 IST

अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रजीच्या बाबतीत झाले आहे.

ठळक मुद्देमराठी वाङ्मय मंडळ कार्यक्रम : श्रीपाद जोशी यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : अरबी, उर्दू शिकता येते, ती भाषा नोकरी देते. मग मराठी का नाही? १९३४ पासून आंम्ही मराठी विद्यापीठ मागतो आहोत, मिळत नाही आहे. जोपर्यंत मराठी समाज भाषा व संस्कृतीबाबत सजग नाही, तोपर्यंत होणार नाही. ज्यांचे अर्थकारण सक्षम त्यांचे भाषाकारण सक्षम, हे इंग्रजीच्या बाबतीत झाले आहे. या राज्यात अजूनही मराठी शिक्षणाचा कायदा नाही. स्वभाषा नाही तर विचार नाही, विचार नाही तर अभिव्यक्ती नाही. पोकळ, दिखाऊंच्या संस्कृतीने मेंदूवर आक्रमण केले आहे. तंत्रज्ञानाची साधने प्रगत असतांना जग विकृत होत आहे. वारकऱ्यांनी, वंचितांनीच मराठी जगविली. आपणच मराठीचे मारेकरी आहोत. स्वत:च्या स्वभाषेचे रक्षण दुसऱ्याचे गळे कापून होणार नाही. मराठी समाज एकसंघ, सजग जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आपली भाषा नोकरीची, व्यवहाराची व संधीची होणार नाही, असे मार्मिक विवेचन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष व श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळ कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एन एस कोकोडे तर उपस्थितीत नागपूरचे कवी वसंत वाहोकार, उपप्राचार्य डॉ. धनंजय गहाणे, मराठी विभागप्रमुख डॉ. धनराज खानोरकर, डॉ. प्रकाश वट्टी उपस्थित होते. याप्रसंगी वाहोकरांनी आता काळ तुमचा आहे, अभिव्यक्ती व्यक्त करण्याचा आहे. सर्वांनी व्यक्त आपल्या स्वभाषेत व्हा, असा सल्ला दिला. पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठाच्या एम ए मराठी परीक्षेत मेरीट विद्यार्थी शितल भानारकर व मनीषा बावणकर यांना गौरविण्यात आले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. कोकोडे म्हणाले, खरं आहे अनेक देश आपल्या स्वभाषेतच तंत्रज्ञान, विज्ञानाचे शोध मांडत आहेत. मेंदूचे भरणपोषण करण्याचे काम साहित्यच करीत असते. भाषा, संस्कृतीचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.प्रास्ताविक डॉ. धनराज खानोरकर तर संचालन डॉ. प्रकाश वट्टी यांनी केले तर आभार प्रा. पद्माकर वानखडे यांनी मानले.