शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनेकांना कोरोनावरील दुसऱ्या डोसचा पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांची संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस  घेतल्यानंतर मुदत संपूनही, केवळ हलगर्जीपणामुळे दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.  दोन्ही कोविड डोस संसर्गापासून बचाव करतात. प्रथम डोस प्रभावीच आहे. पण, दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाविरुद्ध प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे लाखांहून जास्त नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला. मात्र, अनेकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आरोग्य विभागाने दोनही डोसचे महत्त्व पटवून देणे व १०० टक्के लसीकरण करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे.  जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. प्रारंभी गैरसमजांमुळे लस घेणाऱ्यांची संख्या कमी होती. आरोग्य विभागाने सातत्याने जागृतीवर भर दिल्याने, डोस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी होत आहे. केंद्र शासनाकडून सुरुवातीला राज्याला डोस कमी येत होते. त्याचाही परिणाम लसीकरणाच्या व्याप्तीवर झाला.  केंद्रांवर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिक आल्या पावली परत जात होते. आता तर केंद्रांची संख्या ४०० पेक्षा जास्त झाली. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे महत्त्व समजावून सांगणे सुरू झाले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मात्र, पहिला डोस  घेतल्यानंतर मुदत संपूनही, केवळ हलगर्जीपणामुळे दुसरा डोस न घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.  दोन्ही कोविड डोस संसर्गापासून बचाव करतात. प्रथम डोस प्रभावीच आहे. पण, दुसरा डोस रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत करतो. दुसऱ्या डोसने शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीतील मेमरी-बी पेशी निर्माण होतात. हा पांढऱ्या रक्तपेशीचा एक प्रकार आहे.

मुबलक लससाठा  - दुसरी लस वेळेत मिळाली नाही तरी प्रकृतीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी त्याची काळजी करू नये. पण, दुसरी लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळतोच. जिल्ह्यात मुबलक लस उपलब्ध असताना, निष्काळजीपणा व केंद्रात जाऊन एक-दोनदा परत आल्याने  वाढलेली नकारात्मकता, ही कारणे दुसरा डोस घेण्यास अडचणी निर्माण करीत आहेत. यासाठी आरोग्य विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही लसीकरणाची विशेष मोहिम हाती घेतली. या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे.

 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस