शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे न उगविल्याच्या अनेक तक्रारी

By admin | Updated: July 10, 2016 00:36 IST

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची उगवन झाली नसल्याचे वृत्त लोकमतमधून प्रकाशित होताच...

महाबीजची बियाणे : शेतकरी न्यायालयात जाण्याच्या तयारीतवरोरा: तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीज कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांची उगवन झाली नसल्याचे वृत्त लोकमतमधून प्रकाशित होताच महाबीज कंपनी व कृषी विभाग खङबडून जागे झाले. आता पुन्हा अनेक शेतकऱ्यांनी आपणही घेतलेले महाबीजचे बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. दिवसागणिक तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांनी याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.वरोरा तालुक्यातील कृषी विभागाच्या वतीने गळीत धान्य योजने अंतर्गत अनेक गावातील शेतकऱ्यांना दोन बॅग महाबीज सोयाबीन बियाणे पुरविण्यात आले. काही शेतकऱ्यांनी महाबीज सोयाबीन बियाण्यांवर अनुदान मिळत असल्याने कृषी केंद्रातून महाबीजचे सोयाबीन बियाणे ेविकत घेवून शेतात पेरणी केली. यामध्ये वरोरा तालुक्यातील एकट्या भेंडाळा गावातील १२३ शेतकऱ्यांच्या शेतातील महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविलेच नाही. याबाबत तालुका कृषी विभागाने तातडीने संबंधित शेताला भेट देवून पंचनामे करणे सुरु केले आहे. यासोबत साखरा गिरोला, चारगाव, पिंपळगाव आदी गावातील काही शेतकऱ्यांनी महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविले नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे देणे सुरु केल्याने कृषी विभाग व महाबीज कंपनीचे प्रतिनिधी तक्रारी बघून अवाक झाले आहेत. तक्रारी आलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतात जावून पाहणी सुरु केली आहे. नगदी समजले जाणारे सोयाबीेनची उगवन झाली नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले असून यामुळे त्यांना आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे. परिणामी शेतकरी पूर्णत: हताश झाला असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)अतिपावसाचा हास्यास्पद दावा२७ व २८ जून दरम्यान शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाण्यांची पेरणी केली. याच कालावधीमध्ये त्याच गावातील इतर शेतकऱ्यांनी दुसऱ्या कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले. त्यांची उगवन मोठ्या प्रमाणात झाली. २९ जूनला खूप पाऊस परिसरात झाला. त्यामुळे सोयाबीन बियाणे उगविले नाही, असा दावा तज्ज्ञांनी केला. अधिक प्रमाणात पाऊस झाल्यास महाबीज वगळता इतर कंपनीच्या बियाण्यांची कशी उगवन झाली, यावर ते निरुत्तर झाले. त्यामुळे अतिपावसाचा दावा हास्यस्पद ठरला असल्याचे दिसून येत आहे.