शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

शहरातील मुलभूत समस्या सोडविण्यासाठी मनपावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

भरमसाठ वाढविलेला मालमत्ता कर, शहरातील अनेक भागात असलेली पाणी समस्या, बाबूपेठ येथील संथगतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेणे, अमृत योजनेमुळे होणारी पाणी करवाढ, मनपा शाळांचा दर्जा सुधारणे, रमाई आवास योजनेची प्रलंबित प्रकरणे पूर्णत्वास नेणे या सगळ्या ज्वलंत मागण्या घेऊन  शेकडो स्त्री-पुरुष व युवक मनपावर धडकले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात नागरिक अनेक वर्षांपासून वास्तव्य करत आहेत. मात्र, त्यांना  मूलभूत सुविधा पुरविण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महापौर, आयुक्त व मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपूरमधील जनतेला सोबत घेऊन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे पक्षाध्यक्ष प्रवीण खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले.  भरमसाठ वाढविलेला मालमत्ता कर, शहरातील अनेक भागात असलेली पाणी समस्या, बाबूपेठ येथील संथगतीने सुरू असलेले उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेणे, अमृत योजनेमुळे होणारी पाणी करवाढ, मनपा शाळांचा दर्जा सुधारणे, रमाई आवास योजनेची प्रलंबित प्रकरणे पूर्णत्वास नेणे या सगळ्या ज्वलंत मागण्या घेऊन  शेकडो स्त्री-पुरुष व युवक मनपावर धडकले.यावेळी अशोक निमगडे, विशाल अलोने, अशोक टेंभरे, राजस खोब्रागडे, प्रेमदास बोरकर, सुरेश शंभरकर, नागसेन वानखेडे, महादेव कांबळे, हरिदास देवगडे, मृणाल कांबळे, निर्मला नगराळे, अश्विनी खोब्रागडे, अश्विनी आवळे, ज्योती शिवणकर, गीता रामटेके, लीना खोब्रागडे, वर्षा घडसे, अंजली निमगडे, सुनीता बेताल यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.

उपायुक्तांचा   दालनात निषेधअखिल भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे मागण्यांचे निवेदन उपायुक्त अशोक गराटे यांना देण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता, त्यांनी शिष्टमंडळासोबत उद्धट भाषेत संभाषण केले. त्यामुळे त्यांच्या दालनात निषेध नोंदविण्यात आला.

 

टॅग्स :agitationआंदोलन