शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
3
काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
4
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
5
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
6
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
7
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
8
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
9
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
10
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
11
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
12
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
13
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
14
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
15
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
16
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
17
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
18
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
19
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
20
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी

मनपाची घागर उताणी रे...

By admin | Updated: January 13, 2016 01:27 IST

मनपा प्रशासन भरमसाठ कर आकारून नागरिकांची कुचंबना करीत आहे. मात्र आवश्यक गरज असलेले पाणी पुरवठा करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.

चंद्रपूरकरांना अनियमित पाणी पुरवठ्याचा त्रास : महानगर पालिका प्रशासनाकडून दुर्लक्षचंद्रपूर : पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. सर्वात महत्त्वपूर्ण गरज समजले जाणारे पाणीच नागरिकांना मिळणे कठीण झाले असून सर्व बाजुने नागरिकांची ओरड सुरू आहे. मनपाच्या सभेत पाणीसमस्येवर चर्चा होते, मात्र कार्यवाही काहीच होत नाही. चंद्रपूरकर पाण्यासाठी आजही टाहो फोडत आहेत. ‘लोकमत लोकसंवाद’च्या माध्यमातून लोकमत साद दिली. त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रियांचा पाऊद पडला. जनसामान्यांची दखल जनतेचा आवाज लोकसंवादातून मांडत आहेत.मनपा प्रशासनाकडून केला जाणारा पाणी पुरवठा हा अनियमीत असते. यापुर्वी पाणी पुरवठा बंद करण्यापुर्वी सूचना दिली जात होती. मात्र आता कोणतीही सूचना न देता पाणी पुरवठा बंद ठेवला जातो. तुकूम प्रभागातील पाणी पुरवठा रविवार व सोमवारी दोन दिवस बंद होता. त्यामुळे प्रचंड गैरसोय झाली. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपाने विशेष काळजी घ्यावी.- रेखाताई दौड, तुकूम, चंद्रपूर.मनपा प्रशासन भरमसाठ कर आकारून नागरिकांची कुचंबना करीत आहे. मात्र आवश्यक गरज असलेले पाणी पुरवठा करण्याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे. तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे कधी नळ येतात, तर कधी नाही. ज्यांच्याकडे नळाव्यतीरिक्त पाण्याचे दुसरे स्त्रोत नाही, त्यांना नळ न आल्यास पाण्यासाठी मोठी पंचाईत होत असते. मनपा प्रशासनाने या भोंगळ कारभाराकडे त्वरीत लक्ष द्यावे. - मनोज शेळकी, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर.पाणी हे आवश्यक गरज आहे. मात्र मनपा प्रशासन ही आवश्यक गरज पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे. अनेकदा गढूळ पाण्याचा पुरवठा होते. त्यामुळे आजार होण्याची भीती असते. अनेकदा याबाबत तक्रारी केल्या. मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. नळाला पाणी येते मात्र काही वेळातच पुरवठा बंद होतो. त्यामुळे एका कुटुंबाला आवश्यक गरजांसाठी पाणी पुरेल एवढ्या पाण्याचा पुरवठा करावा. अन्यथा घागर मोर्चा नेण्यात येईल. - अजय सहारकर, समाधी वॉर्ड, चंद्रपूर. आरोग्यासाठी शुद्ध पाण्याची गरज असते. मनपा प्रशासनातर्फे शुद्ध पाणी पुरविण्याचे अभिवचन दिले जाते. परंतु पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराच्या मनमानीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नळाद्धारे कधीच शुद्ध पाणी मिळत नाही. त्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. तक्रारी केल्यास तक्रारीची दखलदेखील घेतली जात नाही. -हरिश राऊत, सरकार नगर, चंद्रपूरनळ सुरू झाल्यानंतर किमान अर्धा तास पिवळ्या रंगाचे पाणी येते. अनेकदा मातीमिश्रीत पाणी येते. त्यामुळे बराचवेळ शुद्ध पाण्याची प्रतीक्षा करीत ताटकळत उभे रहावे लागते. हे शुद्ध पाणीदेखील अतिशय अल्पकाळ येते. त्यामुळे नळ असूनदेखील नळाच्या पाण्याचा लाभ मिळत नाही. महानगर पालिकेने तातडीने यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. -ममता इजमुलवार, रामनगर, चंद्रपूरपाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची अतिशय मनमानी सुरू आहे. नळाला पाणी येण्याच्या वेळा ठरलेल्या नाहीत. कधीही पाणी पुरवठा केला जातो अन् मनात येईल तेव्हा तो बंद केल्या जातो. अनेकदा तर दोन-दोन दिवस नळाला पाणी येत नाही. परिणामी अन्य स्त्रोत नसल्याने पाण्यासाठी हिंडावे लागते. यात वेळेचा अपव्यय होतो. या व्यवस्थेत सुधारणा आणावी. - प्रीती गोजे, वडगाव रोड, चंद्रपूर.अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज आहे. त्यामुळे गटारातील पाणी या पाईपमध्ये शिरते. त्यातून पाणी दूषित होते. महिनोगंती हे लिकेजेस दुरूस्त केले जात नाहीत. त्यामुळे जलजन्य आजाराचा सामना करावा लागतो. ग्राहकांकडून वर्षभराचे करापोटी हजारो रुपये वसुल केले जातात. मात्र सुव्यवस्थित पाणी पुरवठा केला जात नाही. - नितीन गुणशेड्डीवार, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर.