शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

माणिकगड विकासाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:34 IST

गडचांदूर-जिवती मार्गावरील माणिकगड पहाडावरील निसर्गाने वेढलेला विलोभनीय अतिप्राचीन माणिकगड किल्ल्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला. विकास निधीसुद्धा मिळाला. बरीच विकास कामे पूर्ण झाली. मात्र अजूनही बरीच विकास कामे प्रलंबित आहेत. ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देपर्यटकांची संख्या वाढली : निधी मिळाला; मात्र विकास कामे प्रलंबितच

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : गडचांदूर-जिवती मार्गावरील माणिकगड पहाडावरील निसर्गाने वेढलेला विलोभनीय अतिप्राचीन माणिकगड किल्ल्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला. विकास निधीसुद्धा मिळाला. बरीच विकास कामे पूर्ण झाली. मात्र अजूनही बरीच विकास कामे प्रलंबित आहेत. ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.माणिकगड किल्ला, विष्णू मंदिर, शंकरदेव मंदिर, अमलनाला प्रकल्प ही प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी चंद्रपूर, यवतमाळ, आदिलाबाद, नागपूर, गडचांदूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यातून पर्यटक मोठ्या प्रमाणात सहकुटूंब येतात. मात्र माणिकगड किल्ल्यावर सुविधा नसल्याने पर्यटक नाराजी व्यक्त करीत असतात. सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते. माणिकगड किल्ल्याच्या विकासासाठी तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी शासनाकडून विकास निधी मंजूर करून घेतला. त्यातून बरीच विकास कामे झाली आहे. मात्र अजूनही बरीच विकास कामे शिल्लक आहे. माणिकगड किल्ल्यापर्यंतचा कच्चा रस्ता मुसळधार पावसाने खराब झाला आहे. सिमेंट रस्ता करणे गरजेचे आहे. किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यानंतर लहान मुलांसाठी खेळणी लावली आहे. मात्र ती दुर्लक्षित आहे. सर्वत्र गवत वाढलेले आहे. विकास कामांसाठी आणखी निधी हवा आहे.चंद्रपूर येथून माणिकगड किल्ला बघण्यासाठी कुटुंबासह आलो. किल्ला खुप सुंदर आहे. मात्र स्वच्छता नसल्याने त्रास होतो. परिसर स्वच्छ असावा व किल्ल्यावर फिरण्यासाठी सिमेंट रस्ते तयार करणे गरजेचे आहे.-अजित गेडाम, एक पर्यटकमाणिकगड किल्ला पुरातन असून विद्यार्थी अभ्यासासाठी येतात. या किल्ल्याचा विकास होणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे.- इबादूल हसन सिध्दीकी,घुग्घुस