लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रस्त्यावर फिरून मिळेल त्या छताखाली राहणाऱ्या बेघर नागरिकांसाठी आश्रय निर्माण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करीत चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ‘रैनबसेरा’ तयार केला आहे. गंज वॉर्डातील मनपा मालकीच्या जुन्या उर्दू शाळेच्या इमारतीत सदर ‘रैनबसेरा’ सुरु करण्यात आला आहे.रैनबसेरा उभारण्यासाठी मागील अर्थसंकल्पात १० लाखांची तरतूद करण्यात आली होती. उभारण्यात आलेल्या रैनबसेरामध्ये महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या खोल्यांची व झोपण्यासाठी खाटांची व्यवस्था केली आहे. तसेच जवळ काही मौल्यवान वस्तू असल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने लॉकर्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.या रैनबसेरात येणाºया प्रत्येकाची नोंद महानगरपालिकेत केली जाणार आहे. कालांतराने त्यांना ओळखपत्र देण्यात येणार असून त्यानंतर ते या सुविधेचा लाभ अविरत घेऊ शकतील. त्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती केली जाणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेतली जाणार आहे. रैनबसेरामुळे शहरातील बेघर आता निश्चिंतपणे रात्र घालवू शकणार आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सदर रैनबसेरा तयार करण्यात आला आहे.रात्रीच्या निवाºयाची सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून देत मनपा प्रशासनाने बेघरांना एकप्रकारे मायेचा आसरा दिला आहे. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या हस्ते गुरुवारी या रैनबसेराचे उद्घाटन झाले.यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, आयुक्त संजय काकडे, मुख्य अभियंता महेश बारई, शाखा अभियंता हजारे, कनिष्ठ अभियंता वैष्णवी रिठे, प्रतीक्षा जनबंधू यांच्यासह मनपाच्या कर्मचाºयांची उपस्थित होती.
निराश्रितांसाठी आता मनपाचा ‘रैनबसेरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:26 IST
रस्त्यावर फिरून मिळेल त्या छताखाली राहणाऱ्या बेघर नागरिकांसाठी आश्रय निर्माण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करीत चंद्रपूर शहर महानगरपालिकेने ‘रैनबसेरा’ तयार केला आहे.
निराश्रितांसाठी आता मनपाचा ‘रैनबसेरा’
ठळक मुद्देबेघरांना मायेचा आधार : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन