शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गिलबिलीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मलेरिया

By admin | Updated: November 29, 2014 01:00 IST

तालुक्यातील एका निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मलेरिया या आजाराने ग्रासले आहे.

बल्लारपूर : तालुक्यातील एका निवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मलेरिया या आजाराने ग्रासले आहे. यातील काहींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन स्वच्छतेबाबत किती जागरुक आहे, याचे चित्र ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांवरुन दिसून येत आहे. या व्यतिरिक्त आणखी विद्यार्थी तापाने फणफणत आहे. आश्रमशाळेतील मलेरियाच्या प्रकोपाने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढली आहे.बल्लारपूर तालुक्यातील गिलबीली येथील यशोधरादेवी आश्रमशाळा अनेक दिवसापासून सुरू आहे. या शाळेत तालुक्यातील गिलबिली, कोर्टीमत्ता, कारवा, इटोली, मानोरा आदी गावातील आदिवासी बालके शिक्षण घेत आहेत. २१ नोव्हेंबरपासून या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना मलेरिया आजाराने ग्रासले आहे.तापाने फणफणत असलेल्या विद्यार्थ्यांना कळमना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी थातूरमातूर उपचार केला. मात्र काहीही उपयोग झाला नसल्याने पालकांनी व शाळेच्या काही कर्मचाऱ्यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात तब्बल ११ शालेय विद्यार्थ्यांना उपचारार्थ दाखल केले.यातील एका विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कुंभारे यांनी दिली.शुक्रवारी सकाळी बबलू आत्राम (११), बेबी पुंगारी (१३) , रुपेश पुंगारी (११) सर्व रा. गिलबिली या विद्यार्थ्यांना उपचार करून घरी पाठविण्यात आले. तरीही आजघडीला येथील ग्रामीण रुग्णालयात गोपाल पोयाम (१२) रा. कोर्टीमत्ता, भूमिका चव्हाण (१०) रा. कारवा, राहुल सोयाम (१२) रा. कोर्टीमत्ता, शांतीकुमार गोमासे (१०) रा. कोर्टीमत्ता, रिंकू हिचामी (१२) रा. गिलबिली, सुशांती रिघा (७) रा. गिलबिली, ईश्वर पेलो (१२) रा. कोर्टीमत्ता आणि अंजणा ढुमणे (१०) रा. गिलबिली या विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहे.देशभरात स्वच्छता अभियानाचा सर्वस्तरावर डंगोरा पिटला जात आहे.ज्याठिकाणी विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी निवासी शाळेत भवितव्य घडविण्यासाठी येतात मात्र शाळाव्यवस्थापनाच्या गलथानामुळे विद्यार्थ्यांचे भावी जीवन कोमेजण्याच्या वाटेवर आले आहे. आरोग्य विभागही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. या संदर्भात या शाळेचे मुख्याध्यापक बंडू पिपरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. (शहर प्रतिनिधी)