शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील संग्रहालयाचा प्रस्ताव तयार करा

By admin | Updated: May 22, 2016 00:40 IST

चंद्रपूर जिल्हा कारागृहाला अन्यत्र स्थानांतरित करुन त्या ठिकाणी गोंडकालिन संग्रहालय स्थापन करण्यासाठी पुरातत्व विभागाने...

हंसराज अहीर यांच्या सूचना : महानगरातील पुरातनस्थळांची पाहणीचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा कारागृहाला अन्यत्र स्थानांतरित करुन त्या ठिकाणी गोंडकालिन संग्रहालय स्थापन करण्यासाठी पुरातत्व विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. चंद्रपूर महानगरातील पुरातन स्थळांची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. या विषयी ना.अहीर यांनी विश्रामगृह येथे बैठक घेतली.स्थानिक विश्रामगृहात आयोजित बैठकीस चंद्रपूरचे आमदार नाना श्यामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, गोंडराजाचे वंशज विकासबाबा आत्राम, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, नागपूर येथील पुरातत्व विभागाच्या अधीक्षक नंदीनी भट्टाचार्य, अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे, अधिक्षक अभियंता बालपांडे, कार्यकारी अभियंता अशोक गाडेगोणे, महानगरपालिचे उपायुक्त रविंद्र इंगोले, अनिल फुलझेले, अंजली घोटेकर, देवानंद वाढई, रमणिकभाई चव्हाण, डॉ.गोपाल मुंदडा, प्रा.सचिन वझलवार, मोहन चौधरी, राजू घरोटे व संजय खनके आदींची उपस्थिती होती.चंद्रपूर शहराचे पुरातनकालिन महत्व असलेले परकोट कायम ठेवून येथील वाहतुकीची कोंडी पर्यायी मार्ग म्हणून शहरात अंडरपास अथवा रोड ओवरब्रिज करण्यासाठी पुरातत्व विभाग आणि महानगरपालिका व स्थानिक प्रशासनाने यात पुढाकार घेवून तातडीने आराखडे तयार करुन त्यासाठी आवश्यक तांत्रिक मंजुरी प्राप्त करुन तातडीने शहराला पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यास पुढाकार घेण्याचे निर्देश दिले.केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शहराच्या परकोटाचे होत असलेले नुकसान थांबवून शहरातील संरक्षित स्मारकांच्या पुनरुध्दार करण्यासाठी तसेच संरक्षित स्मारकाच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामांची केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नागपूर अधिक्षक कार्यालयाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. त्यांनी चंद्रपूर परकोटाच्या ढासळत्या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या चमुला प्रत्यक्ष नेवून संबंधित स्थानाची दखल घेवून तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय चंद्रपूर जिल्हा कारागृहातील प्राचिन गोंडराजा यांच्या राजमहालाची पाहणी करुन कारागृहाला अन्यत्र स्थलांतरित करुन येथे गोंडकालिन संग्रहालय स्थापन करण्याबाबत पुरातत्व विभागाने आवश्यक प्रस्ताव तयार करुन त्यावर आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. चंद्रपूर येथील अंचलेश्वर मंदिराच्या पुरातत्व विभागातर्फे सुरु असलेल्या कामाची पाहणी करुन त्यांनी याबाबत आवश्यक सुचना दिल्या. (प्रतिनिधी)