शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: August 12, 2014 23:39 IST

जिल्ह्यात पावसाळयाची सुरुवात झाल्यापासून कुठेही पर्जन्यमान न झाल्याने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. शेतकऱ्यांची पीके करपून गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : सुभाष धोटेचंद्रपूर : जिल्ह्यात पावसाळयाची सुरुवात झाल्यापासून कुठेही पर्जन्यमान न झाल्याने शेतकऱ्यांचे बेहाल झाले आहे. शेतकऱ्यांची पीके करपून गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कमी झाली आहे. शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर उभे झाले आहे. शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ उद्भवलेली आहे. दुबार तिबार पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे बी- बियाणे नाहीत यासाठी जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, मोफत बी-बियाणे उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांना असलेले कर्ज माफझ करावे यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्र्याकडे मागणी केली आहे. सन २०१३ मध्ये संततधार पाऊस व महापुरामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत झाले होते. त्यामध्ये खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आली. काही शेतकऱ्यांना अद्यापी शासनाची मदत सुद्धा मिळालेली नाही. अश्यातच जगाचा पोशिंंदा असलेल्या शेतकऱ्यांवर पावसाअभावी दुबार, तिबार पेरणीची वेळ उद्भवली आहे. यात ज्वारी, कापूस, सोयाबीन, भात, इत्यादी हातच्या पीकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले व संपूर्ण पीके हातून गेल्यात जमा आहेत. निसर्ग कोपला आहे. शेतकऱ्यांचे हाल केले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. खरीप पीक करपून गेले. त्यामुळे शेतकरी पूर्णत: कोलमडून गेला आहे. महागाईने होरपळलेल्या, कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या गरीब शेतकऱ्यांचे पावसाअभावी कंबरडेच मोडले आहे. अशा वेळी पावसाअभावी नुकसान झालेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत व पुनर्वसन कार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांना निवेदन देवून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत, बँकेचे कर्जमाफ व मोफत बी-बियाणे देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे. (नगर प्रतिनिधी)