शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

योजना राबविण्यापूर्वी जनजागृती करा

By admin | Updated: February 12, 2017 00:40 IST

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकरिता केंद्र सरकारच्या वतीने आम आदमी योजना सुरू करण्यात आली.

शेतकऱ्यांची मागणी : योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतच नाहीचंद्रपूर : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकरिता केंद्र सरकारच्या वतीने आम आदमी योजना सुरू करण्यात आली. मात्र जनजागृतीच्या अभावी तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे ही योजना गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शासनाने योजना राबविण्यापूर्वी प्रभावी जनजागृती करावी, अशी मागणी आहे.ग्रामीण परिसरातील नागरिकांसाठी शासनाने सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत मिळणार होती. परंतु जनजागृतीचा अभाव व लाभार्थ्यांना माहिती देण्यास संबंधित कर्मचाऱ्यांची टाळाटाळ यामुळे ग्रामीण भागातील शेकडो नागरिक या योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील आम आदमी केंद्र मानून शासनाने २००७ मध्ये आम आदमी विमा योजना सुरू केली. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील आम आदमी या योजनेचा लाभार्थी होऊ शकतो. सुरुवातीला या योजनेकरिता फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ८ जून २०११ रोजी शासनाने काढलेल्या एका नवीन अध्यादेशानुसार पाच एकरांपेक्षा कमी जिरायती व अडीच एकरांपेक्षा कमी बागायती शेतजमीन असलेली म्हणजेच अल्पभूधारक व्यक्तीही या योजनेची लाभार्थी होऊ शकते. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक अंगणवाडीसेविका यांच्याकडे देण्यात आली. या योजनेची बऱ्याच लोकांना माहितीच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत ही योजना पोहोचलीच नाही. (शहर प्रतिनिधी)