शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२५० कोटींच्या रस्ता बांधकामात मेजर मिनरलचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 06:00 IST

कोणत्याही रस्ता बांधकामात कधीही मेजर मिनरलचा वापर केला जात नाही. रस्ता बांधकामाकरिता या मेजर मिनरलचा वापर करण्याची परवानगीसुद्धा दिली जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यात आजवर झालेल्या रस्ता बांधकामात मेजर मिनरलचा कुठेही वापर करण्यासाठी संबंधित विभागाने परवानगी दिली गेली नसल्याचे समजते.

ठळक मुद्देदुर्लक्ष : पडोली ते राजुरा व पौनी ते कोरपना मार्गाचे बांधकाम निकृष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती ते राजुरा तसेच पौनी-कवठाळा-नारंडा-वनोजा ते कोरपना या दोन्ही मार्गासाठी सुमारे २५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराने या रस्ता बांधकामात मायनर मिनरलऐवजी मेजर मिनरलचा वापर सुरू केला आहे. मायनर मिनरलपेक्षा मेजर मिनरलसाठी पटीने महसूल शासनाकडे जमा करावा लागतो. कंत्राटदाराच्या या क्लृप्तीमुळे शासनाचा मेजर मिनरलचा महसूल बुडणार आहे. शिवाय हा मार्ग निकृष्ठ दजार्चा होईल. यामुळे तो लवकरच खराब होणार असल्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहेत.कोणत्याही रस्ता बांधकामात कधीही मेजर मिनरलचा वापर केला जात नाही. रस्ता बांधकामाकरिता या मेजर मिनरलचा वापर करण्याची परवानगीसुद्धा दिली जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यात आजवर झालेल्या रस्ता बांधकामात मेजर मिनरलचा कुठेही वापर करण्यासाठी संबंधित विभागाने परवानगी दिली गेली नसल्याचे समजते. असे असताना पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती ते राजुरा तसेच पौनी-कवठाळा-नारंडा-वनोजा ते कोरपना या दोन्ही मार्गाच्या बांधकामात कंत्राटदार मायनरच्या नावावर मेजर मिनरलचा वापर कसा काय करीत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पडोली- दाताळा- देवाडा- हडस्ती ते राजुरा व पौनी-कवठाळा- नारंडा-वनोजा ते कोरपना या दोन्ही मागार्साठी शासनाने सुमारे २५० कोटींचे कंत्राट एम. बी. पाटील कंस्ट्रक्शन कंपनीला दिलेले आहेत. या कंपनीने वनोजा येथे स्वत:चे क्रशर लावले आहे. हे क्षेत्र सिमेंट कंपन्यांसाठीच निर्धारित आहे हे विशेष.सिमेंट निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडाचा वापर रस्ता बांधकामात होत आहे. वापरण्यात येत असलेला दगड मेजर मिनरलमध्ये मोडतो. वास्तविक, रस्ता बांधकामात मायनर मिनरलचा वापर केला जातो. मेजर मिनरलसाठी मायनर मिनरलपेक्षा शासनाकडे अधिक महसूल जमा करावा लागतो. मात्र संबंधित कंत्राटदार मेजर मिनरलला मायनर मिनरल असल्याचे दाखवून शासनाचा महसूलही बुडवत असल्याची माहिती अधिकारी सूत्राने दिली.रस्ता अल्पावधिचा ठरणाररस्ता बांधकामात टणक दगडाचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे रस्ता बराच काळपर्यंत टिकून राहतो. मात्र पडोली-दाताळा-देवाडा-हडस्ती ते राजुरा व पौनी-कवठाळा-नारंडा-वनोजा ते कोरपना या दोन्ही मागार्साठी वापरात येत असलेला दगड हा चुनखडी स्वरूपाचा असून तो ठिसूळ व चपटा आहे. तो वाहनांच्या वर्दळीमुळे फुटून रस्ता अल्पावधितच खराब होईल, असे काही अधिकारी वर्गांचे म्हणणे आहे. भविष्यात पुन्हा या रस्त्यासाठी शासनाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार आहे. तेव्हा वेळीच याकडे लक्ष देऊन होत असलेले निकृष्ठ दर्जाचे बांधकाम ताबडतोब थांबवून हे रस्ते मजबूत होईल, यासाठी संबंधित विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.