शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य शेतमालकाला सातबारावरुन केले बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:06 IST

शेतकºयांना त्यांच्या शेतीची मालकी ही महसूल विभागाकडून मिळणाºया सातबारावरुन ठरत असते. त्यामुळे शेती व स्थावर मालमत्तेसाठी सातबारा हा महत्वाचा दस्ताऐवज समजला जातो.

ठळक मुद्दे सातबारावर केली खोटी नोंद : मृत्यपत्राला दिली बगल

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शेतकºयांना त्यांच्या शेतीची मालकी ही महसूल विभागाकडून मिळणाºया सातबारावरुन ठरत असते. त्यामुळे शेती व स्थावर मालमत्तेसाठी सातबारा हा महत्वाचा दस्ताऐवज समजला जातो. मात्र चिमूर तालुक्यातील विहीरगाव साजा क्रमांक ३७ येथील भूमापन क्रमांक २१८ मधील ०.४७ हे. आर. व ०.५३ हेक्टर आर जमिनीचे मालक नांगीबाई पुंडलिक मेश्राम यांच्या नावाने वडीलोपार्जीत शेती होती. मात्र महसूल विभागातील खातोडा (वडसी) येथील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी सातबारामध्ये हेराफेरी करुन मुख्य शेतमालक नांगीबाई मेश्राम यांचे त्यांच्या सातबारावरील नाव खोडून मालमत्तेमधून बेदखल केल्याचा प्रकार पत्रकार परिषेदतून शिवसेना नेते विलास डांगे व वारसदार शिवशंकर बळीराम मेश्राम, सुनील हरिदास मेश्राम रा. खातोडा यांनी उघडकीस आणला आहे.चिमूर तहसील अंतर्गत येणाºया खातोडा (वडसी) येथील नांगीबाई पुंडलिक मेश्राम यांच्या मालकीची भूमापन क्रमांक २१८, साजा क्रमांक ३७ मध्ये साडेचार एकर जमीन होती. मात्र त्यांना मुलबाळ किंवा वारस नसल्याने त्यांनी त्यांचा नातू मसाराम विश्नुदास मेश्राम व पुतणे हरिदास बळीराम मेश्राम यांच्या नावाने स्थावर मालमत्तेचे मृत्यूपत्र करुन ती शेती या दोघांच्या नावाने करुन दिली. त्यामध्ये या दोघांच्या वाटणीला सव्वा दोन एकर जमीन आली. काही कालावधीनंतर नांगीबाई यांचा मृत्यू झाला. हे दोघेही आपसी वाटणीतून शेती करीत होते. मात्र अचानक २०१६ ला या सातबाºयावर खातोडा येथील तलाठी व मंडळ निरीक्षक यांनी मुख्य शेतजमिनीचे मालक नांगीबाई यांचे नाव सातबारावरुन कमी करुन या सातबाºयावर प्रमोद उगस्तरी मेश्राम व दिगांबर उगस्तरी मेश्राम यांची नोंद करुन मुख्य मालकालाच त्यांच्या स्थावर मालकीवरुन बेदखल केले, असा आरोप शिवशंकर मेश्राम व सुनिल मेश्राम यांनी केला आहे.याबाबत सुनील मेश्राम यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली. त्यात भूमापन क्रमांक ९१, १४८, व २०३ च्या सातबाराच्या अभिलेखागारात फेरफार पंजीची पाहणी केली असता या भूमापन क्रमांकात कुठल्याही प्रकारची फेरफार केली नसल्याची माहिती माहिती अधिकारी तथा नायब तहसीलदार श्रीधर राजमाने यांनी ३१ आॅगस्ट २०१६ च्या पत्रातून दिली आहे. महसूल विभागात फेरफारची नोंद नसताना या सातबारामध्ये फेरफार कुणी केली व मुख्य मालकाला स्थावर मालमत्तेतून बेदखल कुणी केले, असा प्रश्न आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन फेरफार करणाºया दोषी अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करुन फौजदारी गुन्हा नोंदवण्याची मागणी शिवसेना नेते विलास डांगे व अन्यायग्रस्त शेतकरी शिवशंकर मेश्राम, सुनील मेश्राम यांनी पत्रकार परिषदेतनू केली आहे.नुकसान भरपाईपासूनही वंचितमुख्य सातबारामध्ये नाव कमी करुन प्रमोद उगस्तरी मेश्राम व दिगांबर उगस्तरी मेश्राम यांच्या नावाने सातबारा असल्याने शासनाची नुकसान भरपाई त्यांना मिळते व मुख्य हक्कदार वंचित राहत आहेत. याच सातबारावर बँक आॅफ इंडिया शाखा नेरी येथून ९० हजार कर्ज घेतले आहे.