शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

महात्मा गांधीजींचे विचार संतश्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:18 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवी कल्याणाचा विचार मांडला. ते राजकारणी नव्हते तर उच्च कोटीचे चिंतक आणि संतांच्या प्रागतिक श्रेणीचे उत्तुुंग महामानव होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अनिल काटकर यांनी केले. ‘म. गांधी यांचे साहित्य आणि विचार’ या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.

ठळक मुद्देअनिल काटकर : शासकीय जिल्हा ग्रंथालयाच्या ग्रंथोत्सवात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मानवी कल्याणाचा विचार मांडला. ते राजकारणी नव्हते तर उच्च कोटीचे चिंतक आणि संतांच्या प्रागतिक श्रेणीचे उत्तुुंग महामानव होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अनिल काटकर यांनी केले. ‘म. गांधी यांचे साहित्य आणि विचार’ या विषयावरील व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या निधीतून उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालया संयुक्त विद्यमाने प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात ग्रंथोत्सव घेण्यात आला होता. मुरलीमनोहर व्यास यांनी विचारपुष्प गुंफले. ते म्हणाले, गांधीजींच्या जीवनात शिस्तीचे अनन्यसाधरण महत्व होते. गांधीजी व्यक्ती नसून शाश्वत विचारधारा आहे. त्यांचा प्रत्येक विचार मननीय व चिंतनीय आहे. त्यांचे विचार राज्यकर्ते व समाजाने आत्मसात केले असते तर आज अनेक निर्माण झाल्या नसत्या. ग्रंथजत्रा कार्यक्रमात म. गांधी यांचे साहित्य व त्यांचे विचार या विषयावर व्यास बोलत होते. २६ जानेवारीला घेण्यात आलेल्या ग्रंथजत्रा कार्यक्रमाला जिल्ह्यातील वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. राष्टÑपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे वाचन चळवळीला गती मिळाली. विद्यार्थी व विविध क्षेत्रातील ्रमान्यवरांनी ग्रंथजत्रेत सहभागी होऊन वैचारिक मेजवानीचा आनंद घेतला. प्रा. डॉ. काटकर यांनी अध्यक्षीय भाषणातून ग्रंथ चळवळीवरही भाष्य केले. जिल्हा ग्रंथपाल राजेंद्र कोरे यांनी आभार मानले.ग्रंथ चळवळीला मिळाली ऊर्जाग्रंथोत्सवाच्या समारोपीय सत्रात सहायक धर्मादाय आयुक्त व्ही. डी. शेंडे यांचे व्याख्यान झाले. माणसाला शारीरिक व मानसिक भुक असते. ही भुक राबविण्यासाठी पुस्तके उपयुक्त आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक राय, मुरलीमनोहर व्यास, प्रा. डॉ. अनिल काटकर उपस्थित होते. राजाराम मोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान कोलकाता यांच्या संकल्पनेतून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने वाचन चळवळीवर आधारीत विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते. सर्वच उपक्रमांनी वाचकांना नवीन प्रेरणा दिली. वाचनालय चालविणाऱ्या संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी व सदस्यांसाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त शेंडे यांचे व्याख्यान उपयुक्त ठरले. ग्रंथालय संस्थांची नोंदणी कशी करावी, कार्यकारी मंडळात परिवर्तन कसे करावे, हिशेब पत्रके तयार करताना कोणती काळजी घ्यावी, यावर त्यांनी मौलिक मार्गदर्शन केले.