शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

महात्मा गांधी हे नेत्यांचे महानेते

By admin | Updated: January 31, 2017 01:46 IST

महात्मा गांधी हे अडाण्यांचे पुढारी असल्याची टीका त्या काळात झाली. मात्र त्यांना मानणारे तत्कालिन नेते

सुरेश द्वादशीवार : दोन दिवसीय व्याख्यानमालेत प्रतिपादन चंद्रपूर : महात्मा गांधी हे अडाण्यांचे पुढारी असल्याची टीका त्या काळात झाली. मात्र त्यांना मानणारे तत्कालिन नेते मोठी उंची असणारे आणि जनसामर्थ्य लाभलेले होते. त्या सर्वांचे पुढारी महात्मा गांधी हे असल्याने ते खऱ्या अर्थाने नेत्यांचे महानेते होते, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले. स्थानिक फिमेल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने स्व. ताराचंद खजांची स्मृती दोन दिवसीय व्याख्यानमालेला सोमवारी सायंकाळी प्रारंभ झाला. त्या प्रसंगी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि टीकाकार’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. स्वातंत्र्यपूर्व इतिहासाचा संदर्भ घेवून विविध दाखले देत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी तब्बल तासभर श्रोत्यांना खिळवून ठेवले. ते म्हणाले, १९१६ मध्ये काँग्रेसमध्ये मागच्या रांगेत बसणारे महात्मा गांधी १९२१ मध्ये पक्षाचे मध्यवर्ती नेते झाले, ते सहजासहजी नव्हे. त्यांचे मोठेपण लोकमान्य टिळकांनी ओळखले होते. चर्चीलनेही त्यांच्या मोठेपणाची भविष्यवाणी केली होती. गांधी हे केवळ बोलके पुढारी नव्हते तर, समन्वयी नेते होते. राजा, धर्मगुरू, सेनापती, असे कोणतेही मोठे पद पाठीशी नसताना लाखो माणसे त्यांच्या पाठीमागे वेड्यासारखी कशी गेली? त्यांच्या आवाहनावर लाठ्या खाण्यापासून तर मरायला माणसं तयार कशी झाली, हे टीका करणाऱ्यांनी समजून घ्यावे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाती शस्त्र घेवून लढणारे जगाच्या पाठीवर अनेक असतील, पण नि:शस्त्रपणे लढणारे जगात महात्मा गांधी एकमेव आहेत. मार्टीन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला यांनीही त्यांच्या नि:शस्त्र लढ्याला महात्मा गांधींची पे्ररणा मानले, हा इतिहास आहे. प्रा. द्वादशीवार पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र सशस्त्र क्रांतीने मिळाले की बापुंच्या नि:शस्त्र लढ्याने, असा प्रश्न देशात नेहमी विचारला जातो. मात्र त्याचे उत्तर टिळकांनी आधीच दिले होते. या देशातील माणसे हल चालविणारी आहेत, तलवार नव्हे. त्यामुळे स्वातंत्र्यांचा लढा त्यातूनच सिद्ध होईल. महात्मा गांधींनी नेहरूंना आपले राजकीय वारसदार नेमले. ते लोकनेते होते. त्यांचे नेते गांधी होते. सरदार वल्लभभाई पटेल गुजरातचे नेते होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी देशात पहिला लढा उभारला. त्या पटेलांचे गांधी हे नेते होते. मौलाना अबुल कलाम आझाद हे देशातील मुस्लिमांचे नेते होते. गांधी हे त्यांचे नेते होते. राजगोपालचारी दक्षिण भारताचे नेते होते. राजेंद्रप्रसाद बिहार, आसाम, ओरिसाचे पुढारी होते. त्यांचेही पुढारी महात्मा गांधी होते, हे समजून घ्यावे. (जिल्हा प्रतिनिधी) नीतीचे तेज ४गांधींनी मिठाचा सत्याग्रह केवळ ७८ माणसांना सोबत घेवून केला. मात्र या लढ्यात संपूर्ण देशच त्यांच्यासोबत चालत होता. मुठभर मिठ उचलून त्यांनी सविनय कायदेभंग केला. त्या सायंकाळी देशातील समुद्रतटावर ठिकठिकाणी लोकांनी पुढे येवून मिठ बनविले, ही त्यांच्या लढ्याची ताकद होती. जनतेच्या एकजुटीचे सामर्थ्य आणि नितीचे तेज किती मोठे असते हे त्यातून दिसते. धारिष्ट्यवान गांधी ४महात्मा गांधींचे धारिष्ठ्य सांगताना प्रा. द्वादशीवार यांनी एक प्रसंग सांगितला. साबरमती आश्रमावर सर्वांचा समान हक्क आहे, असे ते म्हणायचे. इतरांनाही तसे वागायला लावायचे. आश्रमाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने जेवणही निकृष्ठ असायचे. अशातच कस्तुरबा गांधी यांच्या माहेरची मंडळी आश्रमात आली. जेवणानंतर त्यांनी कस्तुरबांकडे २५ रूपये दिले आणि म्हणाले, निदान मुलाबाळांना तरी चांगले खाऊ घाल. कस्तुरबांनी ते पैसे स्वत:कडे ठेवून घेतले. मात्र काही दिवासांनी बापुंना ही गोष्ट माहीत झाली. त्यावर त्यांनी ‘हरिजन’मध्ये कस्तुरबांच्या विरोधात निषेधाचा लेख लिहिला. एवढेच नाही तर त्यांच्या निषेधार्थ एक दिवसाचा उपवासही केला. आपल्याच माणसांविरूद्ध जाहीरपणे असे करायला धारिष्ठ्य लागते. ते त्यांच्या अंंगी होते म्हणूनच गांधी लोकनेते झाले.