शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

व्याघ्र व्यवस्थापनात महाराष्ट्राचीच डरकाळी; मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्याच्या वनखात्याची कामगिरी

By साईनाथ कुचनकार | Updated: April 11, 2023 14:58 IST

२०२३ मध्ये महाराष्ट्रातील वाघांची संख्या चारशेच्या आसपास

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच भारतातील वाघांची संख्या आणि व्याघ्रसंवर्धनात झालेले कार्य संपूर्ण देशापुढे मांडले. भविष्यात अधिक उत्तम कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या या कामगिरीत महाराष्ट्र राज्याचा मोठा वाटा असून, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात व्याघ्र व्यवस्थापनामध्ये महाराष्ट्रानेच डरकाळी फोडली आहे.

२०१४ मध्ये भाजपचे सरकार आले तेव्हा महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० होती. त्यावेळी महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी सूत्रे हाती घेतली आणि सर्वांत आधी वन्यजीव व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. व्याघ्र संवर्धनातून व्याघ्र व्यवस्थापनाचा मार्ग त्यांनी शोधला आणि त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. वाघांची शिकार रोखून त्यांचे संवर्धन करणे, त्यांच्या सुरक्षेची हमी देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील सर्व जंगलांमध्ये प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. केवळ भारतातीलच नव्हे तर देशाबाहेरील पर्यटकांनाही महाराष्ट्रातील जंगलं आकर्षित करतील, यासाठी प्रयत्न केले. व्याघ्र संवर्धनाच्या संदर्भात जनजागृतीचे उपक्रम त्यांनी राबविले. आज २०२३ मध्ये महाराष्ट्रातील वाघांची संख्या चारशेच्या आसपास गेली आहे.

अभिनयातला ‘वाघ’ आला होता धावून

व्याघ्रसंवर्धनाच्या जनजागृतीसाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनयातला ‘वाघ’ महानायक अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत होण्याचे आवाहन केले. अमिताभ बच्चन यांनी आनंदाने त्याचा स्वीकार केला. सर्वसामान्यांना व्याघ्रसंवर्धनाच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याशिवाय व्याघ्रसंवर्धनासाठी माझ्या आवाजाचा आणि चेहऱ्याचा वापर होत आहे, याचा आनंदही त्यांनी मुनगंटीवार यांच्याकडे व्यक्त केला होता.दुपटीने वाढले वाघ

महाराष्ट्रातील वाघांची संख्या २०१४ च्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्रात १९० वाघ होते. आज ही संख्या चारशेच्या आसपास आहे. त्यातही एकट्या ताडोबा प्रकल्पातच दोनशेहून अधिक वाघ आहेत. उर्वरित वाघ पेंच, बोर, उमेर-कऱ्हांडला, नवेगाव-नागझिरा, सह्याद्री क्षेत्र, गडचिरोली या जंगलांमध्ये असल्याची नोंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा विदर्भाच्या दिशेने जास्त आहे.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभागchandrapur-acचंद्रपूर