शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : १९ जणांची माघार; ७१ उमेदवार रणांगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:17 IST

३ जणांनी आपले नामांकन घेतल्यामुळे ११ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहेत. यात काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार, आपच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी व वंचित बहुजन आघाडीचे चंद्रलाल मेश्राम हे प्रमुख उमेदवार रिंगणात लढत देणार आहेत.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : दसऱ्याच्या शुभमूहूर्तावर होणार प्रचाराचा शंखनाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सहाही विधानसभा मतदार संघातून तब्बल १९ जणांनी माघार घेतल्यामुळे आता ७१ उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत. पक्षांसह अपक्षांना बोध चिन्हांचे वाटप झाल्यामुळे दसºयाच्या शूभमुहूर्तावर प्रचाराचा शंखनाद होणार हे नक्की. यानंतर सुमारे १० दिवस प्रचारतोफा गरजणार आहे. यामध्ये मतदार राजाला कोण आपल्याकडे आकर्षित करतो, हे बघण्यासारखे आहे.बल्लारपूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र वैद्य व नितीन भटारकर तसेच अपक्ष संजय गावंडे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने १३ उमेदवारांमध्ये निवडणुकीची चुरस बघायला मिळणार आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे डॉ. विश्वास झाडे व वंचित बहुजन आघाडीचे राजू झोडे हे प्रमुख उमेदवार आमने-सामने आहेत.चंद्रपूर मतदार संघातून ज्योती रंगारी, प्रियदर्शन इंगळे, सुधाकर कातकर व हरिदास लांडे या ४ उमेदवारांनी माघार घेतली असून आता १२ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहेत. यामध्ये भाजपचे नाना श्यामकुळे, काँग्रेसचे महेश मेंढे व अपक्ष किशोर जोरगेवार या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहेत.चिमूर मतदार संघातून रमेश गजबे, गजेंद्र चाचरकर, अमृत नखाते व किशोर घानमोडे या चार उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतल्यामुळे १३ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. यामध्ये भाजपचे उमेदवार कीतीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, काँग्रेसचे उमेदवार डॉ. सतीश वारजुकर व वंचित बहुजन आघाडीचे अरविंद सांदेकर हे प्रमुख उमेदवार आमने-सामने आहेत.ब्रह्मपुरी मतदार संघातून दिलीप शिवरकर, वसंत वारजुकर व धानु वलथरे या ३ जणांनी आपले नामांकन घेतल्यामुळे ११ उमेदवारांमध्ये निवडणूक रंगणार आहेत. यात काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार, शिवसेनेचे उमेदवार संदीप गड्डमवार, आपच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी व वंचित बहुजन आघाडीचे चंद्रलाल मेश्राम हे प्रमुख उमेदवार रिंगणात लढत देणार आहेत.वरोरा विधानसभा मतदार संघातून अंकुश आगलावे या एकमेव उमेदवाराने माघार घेतली असून निवडणूक रिंगणात १३ उमेदवार आहेत. यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर, मनसेचे उमेदवार रमेश राजुरकर व शिवसेनेचे उमेदवार संजय देवतळे यांचा समावेश आहेत.राजुरा मतदार संघातून भारत आत्राम, रामराव चव्हाण, तुकाराम पवार व पंकज पवार या ४ उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतल्याने १२ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहेत. यामध्ये काँग्रेसचे भाजपचे अ‍ॅड. संजय धोटे, काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे व स्वभापचे अ‍ॅड. वामनराव चटप या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहेत. सोमवारी निवडणूक चिन्ह वाटप झाल्याने आता सहाही मतदार संघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर