शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; केवळ सहाच महिला उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्याचा मोठेपणा दाखवला नाही.

ठळक मुद्देउपेक्षा सुरूच। चार राजकीय पक्षांनी दिली संधी

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस, भाजप, आप, एपीआय, अखिल भारतीय मानवता पक्षाचा अपवाद वगळल्यास अन्य राजकीय पक्षांनी महिलांना उमेदवारीच दिली नाही. महिलांना संधी मिळाली तर त्या कर्तृत्व सिद्ध करू शकतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महिलांना डावलल्याचे स्पष्ट झाले आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण ७१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या ७१ पैकी केवळ सहा महिला उमेदवारांना संबंधीत पक्षांनी उमेदवारी दिली आहे. यातील दोन महिला उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदार संघातून तारा काळे (अपक्ष), ब्रह्मपुरी मतदार संघातून पारोमिता गोस्वामी (आप), वरोरा मतदार संघातून प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), चिमूर मतदार संघातून वनिता राऊत (अभामाप), चंद्रपूर मतदार संघातून अमरिता गोगूलवार (एपीआय) व राजुरा मतदार संघातून रेश्मा चव्हाण (अपक्ष) या सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे. देशाचे राष्टÑपतीपद व पंतप्रधानपद महिलांनी यशस्वीरित्या भूषविले. अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्टÑमंत्री यासारख्या महत्त्वाच्या पदांवर कार्य करून गुणवत्तेचा ठसा उमटविला. राजकीय क्षेत्रासोबतच विज्ञान, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रातही महिलांचे पाऊल पुढे आहे. संधी मिळाल्यानेच हे शक्य होऊ शकले. जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाच्या चळवळींनी आता वेग धरला. शिक्षणाचे प्रमाणही वाढले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांची टक्के वाढताना दिसत आहे. परंतु, आरक्षणाच्या पलिकडे जाऊन कर्तृत्ववान महिलांना मुख्य राजकीय पक्षांनी उमेदवारी देण्याची मानसिकता अजुनही तयार केली नाही.जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक महिला उमेदवार रिंगणात आहे. महिला आरक्षणाच्या बाजुने आहोत, असा दावा करणारे भाजप, शिवसेना, मनसे, बसपा, भाकप, संभाजी ब्रिगेड, रिपाइं, बीआरएसपी, गोंडवाना गणतंत्र पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष व अन्य लहान राजकीय पक्षांनीही महिलांना उमेदवारी देण्याचा मोठेपणा दाखवला नाही. त्यामुळे महिला स्वत:हून राजकारणात येत नाहीत की प्रमुख राजकीय पक्ष त्यांना हेतुपूर्वक वंचित ठेवतात, असा प्रश्न सामाजिक चळवळीतील महिला कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर